लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वसंत भवन व रघुवंशी कॉम्प्लेक्स या शहरातील दोन मोठ्या व्यापारी व निवासीसंकुलात शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठा स्फोट होऊ शकतो. या आशयाची नोटीस महावितरण कंपनीने बजावली आहे. आतापर्यंत तीन ते चार नोटीस पाठवल्यानंतरही संकुल मालकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. दरम्यान, या दोन्ही संकुलात लोकांची वर्दळ राहात असल्याने जीवित व वित्तहाणी होण्याची शक्यता आहे.चंद्रपूर शहराच्या मध्यभागी रघुवंशी व्यापारी संकुल व जटपुरा गेटजवळ जिल्हा परिषदेच्या मालकीचे वसंत भवन हे निवासी व व्यापारी संकुल आहे. या दोन्ही संकुलाची अवस्था अतिशय वाईट आहे. रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये अवैध बांधकाम केल्याने सर्वात वरच्या मजल्यावरील छत महापालिकेच्या बांधकाम विभागाने पाडले आहे. इतकेच नाही तर या संकुलातील विद्युत व्यवस्था अतिशय तकलादू आहे. वीज मीटर लावताना नियमांचे सर्रास उल्लंघन केले आहे. तसेच उघड्यावर मीटर लावण्यात आलेले आहे. शहरातील सर्वात मोठे संकुल असल्याने व बँक, हॉटेल कपडा दुकान, जीम, कोचिंग क्लॉसेस, हॉस्पिटल तथा इतर कार्यालये असल्याने येथे लोकांचे येणे-जाणे अधिक आहे.या सर्व गोष्टी बघत संकुल मालकांनी त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीणे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे महावितरणने या संकुलाला आतापर्यंत तीन नोटीस बजावले आहेत.विशेष म्हणजे, तीन नोटीस मिळाल्यानंतर संकुल मालकाने दुरुस्ती केलेली नाही. चौथा व पाचवा नोटीस इमारतीवर चिपकवण्यात आला आहे. या इमारतीत विद्युत व्यवस्था पूर्णत: तकलादू असल्याने कधीही स्फोट होऊन आग लागू शकते. पूर्ती बाजारची पुनरावृत्ती शहरात होण्याची भीतीही व्यक्त केली आहे.जिल्हा परिषदेच्या मालकीच्या वसंत भवन इमारतीची अवस्थाही अशीच आहे. त्यांनाही नोटीस पाठवल्या आहेत. मात्र, जिल्हा परिषदेचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे. वारंवार नोटीस दिल्यानंतरही कुठलीही व्यवस्था केली जात नसल्याने महावितरण कंपनीने एक दिवस या दोन्ही संकुलाचा वीज पुरवठा सुद्धा खंडीत केला होता. मात्र, त्यानंतरही दोन्ही विभागाने कुठलीही सुधारणा केली नाही.अनुचित घटनेची भीतीवसंत भवन व रघुवंशी कॉम्प्लेक्स हे शहराच्या मध्यभागी असल्याने मोठ्या प्रमाणात रहदारी राहते. त्यामुळे जर याठिकाणी शॉर्टसर्किट होऊन स्फोट झाला तर वित्तहाणी व जिवीत हाणी होण्याची शक्यता आहे. जर ही परिस्थिती ओढावली तर याला जबाबदार कोण राहणार, असा प्रश्नही महावितरणने वसंत भवन व रघुवंशी कॉम्पलेक्सला दिलेल्या नोटीसमधून विचारला आहे.
शॉर्टसर्किटमुळे आगीचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 23:54 IST
वसंत भवन व रघुवंशी कॉम्प्लेक्स या शहरातील दोन मोठ्या व्यापारी व निवासीसंकुलात शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठा स्फोट होऊ शकतो. या आशयाची नोटीस महावितरण कंपनीने बजावली आहे. आतापर्यंत तीन ते चार नोटीस पाठवल्यानंतरही संकुल मालकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.
शॉर्टसर्किटमुळे आगीचा धोका
ठळक मुद्देमहावितरण : रघुवंशी कॉम्प्लेक्स व वसंत भवनाला नोटीस