डिझेल दरवाढीमुळे शेतीची ट्रॅक्टर मशागत महागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:41 IST2021-02-05T07:41:52+5:302021-02-05T07:41:52+5:30
चंद्रपूर : मागील काही दिवसामध्ये शेतीच्या मशागतीमध्ये ट्रॅक्टरला अधिक महत्त्व आले आहे. मात्र डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रॅक्टर मालकांनी आपलेही ...

डिझेल दरवाढीमुळे शेतीची ट्रॅक्टर मशागत महागली
चंद्रपूर : मागील काही दिवसामध्ये शेतीच्या मशागतीमध्ये ट्रॅक्टरला अधिक महत्त्व आले आहे. मात्र डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रॅक्टर मालकांनी आपलेही दर वाढविल्यामुळे शेतकऱ्यांना मशागतीसाठी अधिकचा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.
पूर्वी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात बैलजोड्या असायच्या. मात्र आता चारापाणी, देखरेख आदी खर्च वाढल्यामुळे तसेच झटपट काम करण्यासाठी शेतकरी बैलजोडी न ठेवता ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत करीत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस अधिकाधिक शेतकरी ट्रॅक्टरलाच पसंती देत आहेत. मात्र डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रॅक्टर मालकांनी मशागतीचे दरही वाढविले आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी अधिकचा आर्थिक भार शेतकऱ्यांना सहन करावा लागत असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे डिझेल दरवाढीमुळे ट्रॅक्टर चालकांचाही नाईलाज झाला आहे. त्यामुळे त्यांनीही दर वाढविले आहे.
----
मशागतीचे दर
नांगरणी
रोटा
खुरटणी
नांगरणी, रोटा
पेरणी
पालाकुट्टी
--
कोट
डिझेल दरवाढीचा परिणाम शेतिव्यवसायावर झाला आहे. शेतमालाचे भाव वाढले नाही, मात्र डिझेलचे वाढले आहे. त्यामुळे आर्थिक ताळमेळ जुळत नसून शेतकऱ्यांनाच नुकसान सहन करावा लागत आहे. यावर्षी उत्पादन कमी आहे. त्यातच कापूस, सोयाबीन, तुरीला भाव नाही. त्यातच वाढलेले डिझेलचे भाव शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारे आहे.
- प्रवीण मेश्राम
शेतकरी धाबा
---
यावर्षी किडीचा प्रादुर्भाव तसेच पावसामुळे खरीप हंगामामध्ये मोठे नुकसान झाले आहे. पेरणीपासून काढणीपर्यंत मोठ्या प्रमाणात खर्च केला. मात्र उत्पादन कमी आणि खर्च जास्त झाला आहे. आता तर डिझेलचे दर वाढले आहे. त्यामुळे ट्रॅक्टरद्वारे मशागतीचे काम करणेही कठीण झाले आहे.
- सुरेश मडावी
कोरपना