शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

By admin | Updated: October 14, 2014 23:16 IST

७१-चंद्रपूर विधानसभा निवडणुकीतील मतदानासाठी येथील प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे. मतदान केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नजर ठेवली जात असून पोलीस विभागालाही सतर्क राहण्याच्या

चंद्रपूर : ७१-चंद्रपूर विधानसभा निवडणुकीतील मतदानासाठी येथील प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे. मतदान केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नजर ठेवली जात असून पोलीस विभागालाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चंद्रपूर विधानसभा मतदार संघात एकूण ३३६ मतदान केंद्र आहेत. या संघातील पोलींग पार्टीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर , चंद्रपूर विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने व तहसीलदार गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट व साहित्य वाटप करण्यात आले. या साहित्यांसह आज मंगळवारी पोलींग पार्टी आपआपल्या मतदान केंद्रावर रवाना झाल्या. विधानसभेसाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करुन लोकशाही मजबूत करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.चंद्रपूर विधानसभा मतदार केंद्रात एकूण तीन लाख ५८ हजार २७ मतदार आहेत. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात तसे संवेदनशिल केंद्र नसले तरी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील सर्व ३३६ मतदान केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी एक उपविभागीय पोलीस अधिकारी, पाच पोलीस निरीक्षक, ३७ पोलीस उपनिरीक्षक व ९११ कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, आज निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस विभागाने मतदान केंद्रांची पाहणी केली. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काय खबरदारी घ्यायची याबाबतही उपस्थित कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. उद्या १५ आॅक्टोबरला सकाळी ७ वाजेपासून विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रांवर मतदानाला प्रारंभ करण्यात येणार आहे. (शहर प्रतिनिधी)