विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:01 IST2019-09-30T05:00:00+5:302019-09-30T05:01:03+5:30

शाळेत दाखल झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांंना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही शिक्षकांची तसेच शिक्षणाशी संबंधित सर्व यंत्रणाची जबाबदारी असून त्या दृष्टीने प्रत्येकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावरून यासाठी विविध प्रशिक्षणही दिल्या जात आहे.

Right to quality education to students | विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अधिकार

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अधिकार

ठळक मुद्देबाबुराव मडावी : पोंभुर्णा येथे पार पडले गुणवत्ता विकास प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा : शाळेत दाखल झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांंना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही शिक्षकांची तसेच शिक्षणाशी संबंधित सर्व यंत्रणाची जबाबदारी असून त्या दृष्टीने प्रत्येकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावरून यासाठी विविध प्रशिक्षणही दिल्या जात आहे. मात्र आजही काही शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना वाचन क्षमता व गणितीय मुलभूत क्रिया करता येत नसल्याचे एका अहवालावरून लक्षात आले आहे. त्यामुळे शिक्षकांसाठी प्रशिक्षण असून प्रत्येक शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे, ृअसे मत पोंभूर्णा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाबुराव मडावी यांनी व्यक्त केले.
पोंभुर्णा पंचायत समितीच्या वतिने आयोजित पाच दिवसीय अध्ययन स्तर निश्चिती व गुणवत्ता विकास कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद शिक्षण समितीचे स्वीकृत सदस्य जे. डी. पोटे, केंद्रप्रमुख विलास रोहनकर आदींची उपस्थिती होती.जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने प्रत्येक शाळेतील शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणातून देण्यात येणाऱ्या अद्यावत माहितीद्वारे शिक्षकांनी विद्यार्थ्यांची आकलन क्षमता, वाचन व गणितीय मुलभूत क्रिया १०० टक्के करण्याच्या दृष्टिने प्रयत्न करणे गरजेचे आहे. या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांची प्रगती साधायची आहे, असही मडावी यावेळी म्हणाले.शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांला आपला आत्मविश्वास कसा वाढेल, भाषा, गणित व अन्य विषयांची आवड कशी निर्माण होईल, यादृष्टीने अध्ययन अनुभव देण्यात यावे असे आवाहनही केले. या प्रशिक्षणात भाषा व गणित विषयाच्या विविध संकल्पना कृती, प्रात्याक्षिकाद्वारे शिक्षकांना सांगण्यात आल्या. संचालन भिमानंद मेश्राम यांनी केले.विषयतज्ज्ञ संगीता गणवीर, विकास गणवीर, प्रविण गणवीर, रवी मडावी आदिंनी सहकार्य केले.

यांनी दिले प्रशिक्षण
भाषा व गणित या विषयासाठी पाच दिवस चालणाºया प्रशिक्षणासाठी साधन व्यक्ती म्हणून प्रशांत नंदनवार,स्मिता अवचट, संजय मेश्राम,सतीश शिंगाडे,शालीक गेडाम,योगेश देशमुख,मंजुषा डंभारे आदिंची उपस्थिती होती.

Web Title: Right to quality education to students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक