मावाणी दोषी आढळल्यास त्यांचा परवाना रद्द करा

By Admin | Updated: August 18, 2015 01:10 IST2015-08-18T01:10:43+5:302015-08-18T01:10:43+5:30

डॉ. मावाणी यांची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन अप्पर

Revoke the License if Malini is found guilty | मावाणी दोषी आढळल्यास त्यांचा परवाना रद्द करा

मावाणी दोषी आढळल्यास त्यांचा परवाना रद्द करा

चंद्रपूर : डॉ. मावाणी यांची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
चंद्रपूर शहरात सोडा तर संपूर्ण जिल्ह्यात कुठे ना कुठे महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. डॉ.मावाणी यांनी एका पीडित महिलावर अत्याचार केल्याचा आरोप महिलेने पोलिसात केला आहे. या प्रकरणारची सखोल चौकशी करून आरोपी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व त्यांचा वैद्यकीय परवाना रद्द करावा.
चंद्रपूर शहरात अशा निंदनीय प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पीसीआर व्हॅनच्या गस्ती वाढविण्यात याव्या, शहरात सर्व खासगी रुग्णालयाच्या महिला प्रसाधन गृह व स्तनपान कक्षाची कसून चौकशी करण्यात यावी. कारण अशा ठिकाणी छुपे सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
मावाणी दोषी आढळल्यास त्यांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात यावा. दिवसेंदिवस महिलावरील होणारे लैगिंक छळ व अत्याचार थांबविण्याकरिता जिल्हा पोलीस व जिल्हा प्रशासनाने जबाबदारी घेऊन असे कृत्य करणारे दोषी आढळल्यास हे प्रकरण जलदगती न्यायालयात प्रविष्ट करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केली. शिष्टमंडळात राकाँचे महासचिव अ‍ॅड.हिराचंद बोरकुटे, प्रदेश सल्लागार हेमलता पाजनकर, जिल्हा उपाध्यक्ष वंदना आवळे, जिल्हा सचिव माया ठावरी, मंदा शेरकी, मायाबाई दुपारे, ममता गोजे, सुभाष गुडे, शांताराम वैद्य, बाबुलाल मेश्राम अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Revoke the License if Malini is found guilty