ब्रिटिशकालीन मालगुजारी तलावाचे पुनरुज्जीवित

By Admin | Updated: July 25, 2015 01:14 IST2015-07-25T01:14:35+5:302015-07-25T01:14:35+5:30

ब्रह्मपुरी पंचायत समिती अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध प्रकारची कामे उपलब्ध करुन ...

Revival of the British Malguzari lake | ब्रिटिशकालीन मालगुजारी तलावाचे पुनरुज्जीवित

ब्रिटिशकालीन मालगुजारी तलावाचे पुनरुज्जीवित

ब्रिटिशकालीन मालगुजारी तलावाचे पुनरुज्जीवित
गांगलवाडी: ब्रह्मपुरी पंचायत समिती अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध प्रकारची कामे उपलब्ध करुन मजुरांना मागील चार वर्षापासून रोजगार देण्यात येत आहे. बुधेवाडा येथे ब्रिटीशकालीन माजी मालगुजारी तलाव मागील २० वर्षापासून दुर्लक्षित होते. त्यालाही पुनरुजिवित करणे सुरू झाले आहे.
या तलावाची पाळ जुन्या काळात गोट्यांनी बांधलेली असल्यामुळे जीर्ण होऊन वाहून गेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी अडचण जात होती. तळोधी खुर्दचे सरपंच प्रमोद मोटघरे व संवर्ग विकास अधिकारी तोडावार यांनी प्रयत्न करुन सदर तलावाचे खोलीकरण व दुरुस्तीचे काम पूर्ण केले. तसेच सदर तलावास दोन तुडूंब व नवीन सलांग व तलावाच्या पाळीचे मातीकाम महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून पूर्ण करण्यात आले. शुन्य सिंचनावर आलेला तलाव आता ४० हेक्टर सिंचन करु शकतो.
तसेच या तलावापासून निघालेल्या सांडव्याचे रुपांतर समोर नाल्यात होऊन तो चार किमी अंतर गोगाव येथील मोठ्या नाल्याला मिळतो. सदर नाल्यावर पाच साखळी बंधाऱ्याचे बांधकाम प्रस्तावित करण्यात आले आहे. जेणेकरुन तलावातील जास्तीचे पाणी सांडव्यावरुन निघून या पाच बंधाऱ्यात साठविले जाऊ शकते व या पाण्यापासून १५० हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊन शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो. मात्र संबंधित अभियंत्यांची बदली झाल्याने यात अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असलेल्या प्रकल्पाचे काम बंद पडण्याची भीती या भागातील सरपंचांनी व्यक्त केली आहे. यासाठी सदर अभियंत्यांची बदली रद्द करुन त्यांनी ब्रह्मपुरीलाच ठेवावे, अशी मागणी सरपंचांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Revival of the British Malguzari lake