कापूस वेचणी करून परतणाऱ्या मजुरांचे वाहन उलटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST2019-12-25T05:00:00+5:302019-12-25T05:00:35+5:30

राजुरा तालुक्यातील सिध्देश्वर देवाडा जुन्यो चेक पोस्टच्या समोर काही अंतरावर कापूस वेचणी करून परतणाºया महिलांचे वाहन उलटले. यात एक महिला जागीच ठार तर १५ महिला-पुरूष गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.

The returning laborers' vehicle was overturned by cotton scraping | कापूस वेचणी करून परतणाऱ्या मजुरांचे वाहन उलटले

कापूस वेचणी करून परतणाऱ्या मजुरांचे वाहन उलटले

ठळक मुद्देएका महिलेचा मृत्यू, १५ जण जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
देवाडा : राजुरा तालुक्यातील सिध्देश्वर देवाडा जुन्यो चेक पोस्टच्या समोर काही अंतरावर कापूस वेचणी करून परतणाºया महिलांचे वाहन उलटले. यात एक महिला जागीच ठार तर १५ महिला-पुरूष गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
उषाबाई सकाराम चौधरी (३०) रा. खालसपेठ ता. मूल असे मृत महिलेचे नाव आहे. तर जखमींमध्ये नंदा वाढई (४५), प्रल्हाद निमगडे (५६), सुनिता वाढई (३५), रमेश जितेंद्र वाडके (५२), नंदा कोडापे (४८), सखाराम वाढई (४०), सविता निकोरे (३०), पुंडलिक निकोरे (४५), वर्षा वाडके (३५), आशा गुरनुले (२६), आशा मडावी (४५), अश्विनी मडावी (१९), रूपेश काळे (३३), रजू कवठे (४०) यांचा समावेश असून सर्व मूल तालुक्यातील रहिवासी आहे.
सर्व शेतमजूर मंगळवारी राजुरा येथील रऊफभाई यांच्या मालकीचे शेतातून परत येत असताना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सिध्देश्वर देवाडा जुन्या चेक पोस्टसमोर त्यांचे पीक अप वाहन (क्र. एम एच ३४ बीजी २६४८) उलटले. यात उषाबाई चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर शेतमजूर जखमी झाले.

Web Title: The returning laborers' vehicle was overturned by cotton scraping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात