सेवानिवृत्त बीएसएफ जवानाचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:28 IST2021-04-04T04:28:30+5:302021-04-04T04:28:30+5:30

पळसगांव (पि) : चिमूर तालुक्यातील नेरी जवळील खुटाळा येथे भारतीय सुरक्षा बलाचा सैनिक बाळकृष्ण कळाम यांनी भारतीय सुरक्षा बलमध्ये ...

Retired BSF jawan felicitated | सेवानिवृत्त बीएसएफ जवानाचा सत्कार

सेवानिवृत्त बीएसएफ जवानाचा सत्कार

पळसगांव (पि) : चिमूर तालुक्यातील नेरी जवळील खुटाळा येथे भारतीय सुरक्षा बलाचा सैनिक बाळकृष्ण कळाम यांनी भारतीय सुरक्षा बलमध्ये २० वर्षे ७ महिने आपली सेवा दिली. सेवानिवृत्तीपूर्वी त्यांनी देशातील काश्मीर, पंजाब, बंगाल, त्रिपुरा, झारखंड या राज्यात आपली सेवा दिली होती. २००३ मध्ये जम्मू-काश्मीर येथे घडलेल्या गाजीबाबा प्रकरणप्रसंगी कळाम त्या ठिकाणी कार्यरत होते.

देशाचे रक्षण करणारे सेवानिवृत्त सैनिक बाळकृष्ण कळाम हे सेवा देऊन आपल्या घरी परतले असता, खुटाळा येथे त्यांच्या राहत्या घरी संपूर्ण परिवारासह ग्रामवासीयांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. याप्रसंगी खुटाळा ग्रा.पं. उपसरपंच विनोद बारसागडे, सदस्य तुलाराम बारसागडे, माजी उपसरपंच गुणवंत गायकवाड, अंकोश कळाम, कोमल श्रीरामे, रमेश गुरुनुले, प्रमोद श्रीरामे, प्रफुल्ल वाघमारे, प्रतिष्ठित नागरिक व गावकरी उपस्थित होते.

Web Title: Retired BSF jawan felicitated