कंत्राटी पद्धतीने पे-पार्किंगचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:59 IST2021-09-02T04:59:01+5:302021-09-02T04:59:01+5:30

चंद्रपूर : गांधी चौक पटांगण, सातमजली इमारत परिसर, महात्मा गांधी शाळेची जागा व ग्रेन मार्केट आदी ठिकाणी कंत्राटी पद्धतीने ...

Resolution of pay-parking on contract basis | कंत्राटी पद्धतीने पे-पार्किंगचा ठराव

कंत्राटी पद्धतीने पे-पार्किंगचा ठराव

चंद्रपूर : गांधी चौक पटांगण, सातमजली इमारत परिसर, महात्मा गांधी शाळेची जागा व ग्रेन मार्केट आदी ठिकाणी कंत्राटी पद्धतीने पे-पार्किंग सुरू करण्याचा ठराव मनपाने आज मंजूर केला. गांधी चौक पटांगण, सात मजली इमारतीच्या दक्षिण व पश्चिम भागाकडील जागा व जुनी महात्मा गांधी शाळेतील खुल्या जागेवर मनपाकडून दोन चाकी १० रुपये व चार चाकी वाहनाधारकांकडून २० रुपये शुल्क आकारणी सुरू आहे. अपुरे मनुष्यबळ असल्याचे कारण पुढे करून मनपाने पे पार्किंग करण्याचा ठराव मंजूर केला आहे.

कोट

कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार, ऑनलाईन सभा घेतल्या जात आहेत. सर्व पक्षाचे गटनेते व नगरसेवकांना मनपाच्या सभेची नोटीस दिली होती. त्यांनी ऑनलाईन सभेत सहभागी व्हायला पाहिजे. मात्र, विरोधकांनी केवळ विरोधासाठीच आंदोलन केले.

-राखी कंचर्लावार, महापौर मनपा, चंद्रपूर.

Web Title: Resolution of pay-parking on contract basis