शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्याला विरोध तरीही बांधकामाचा हट्ट

By admin | Updated: April 8, 2016 01:01 IST

चिमूर तालुक्यातील लोकसंख्येने सर्वात मोठे नदीच्या तिरावर असलेले गाव म्हणून नेरीची ओळख आहे.

मागणी : बंधारा नेरी सोनेगाव रस्त्यावर हलविण्यात यावानेरी : चिमूर तालुक्यातील लोकसंख्येने सर्वात मोठे नदीच्या तिरावर असलेले गाव म्हणून नेरीची ओळख आहे. या नदीवर मागील काही दिवसांपासून बंधारा बांधकामाच्या हालचाली सुरू होत्या. परंतु त्या बंधारा बांधकामामुळे गावातील टिळक वार्ड क्र. १ मधील नागरीकांना पुराचा धोका संभव असल्यामुळे त्या बंधाऱ्यास तेथील रहीवाशांनी विरोध दर्शविला. तरीही बंधारा बांधकामाचा हट्ट बांधला जात आहे.आमदार बंडी भागंडिया, जिल्हाधिकारी चंद्रपूर, तहसीलदार चिमूर, उपअभियंता लघुपाटबंधारे विभाग चिमूर, तसेच ग्रामपंचायत नेरीला सुद्धा बंधारा बांधकाम करण्याची जागा बदलविण्याकरीता व बंधारा नेरी सोनेगाव रस्त्यावर हलविण्याकरीता निवेदन देण्यात आले. परंतु, त्या निवेदनावर कोणतीही कार्यवाही न करता पुन: त्याच ठिकाणी बांधकामाचा अट्टहास धरण्यात येत आहे. दरवर्षी पावसाच्या दिवसात नदीला पूर आला की टिळक वार्ड क्र. १ मधील संपुर्ण नदीकाठावरील भागात रस्त्यांवर व रहिवाश्यांच्या घरामध्ये पाणी शिरत असते व त्याचा दरवर्षी रहिवाशांना सामना करावा लागतो. असे असतानाही लोकवस्तीजवळ बांधकाम करू नये असे निवेदन देण्यात आले. या बंधाऱ्यामुळे वॉर्डातील लोकवस्तीला धोका उद्भवू शकतो, असे मत वॉर्डातील अनेक लोकांनी मांडले आहे. याकरीता गावातील नानाजी दडमल यांच्या नेतृत्वात वॉर्डातील रहिवाशांनी स्वत:च स्वाक्षरीसह निवेदन दिले. परंतु त्याच वेळेस त्या बंधाऱ्याचे बांधकाम व्हावे म्हणून वॉर्डातील काही दृष्टप्रवृत्तीच्या वॉर्डा व्यतीरिक्त लोकांच्या खोट्या सह्या करून निवेदन दिले व नुसत्या एकट्याच्या दबावात पुन: बांधकाम सुरू करण्यात आले, असे नानाजी दडमल यांनी सांगीतले.या बंधारा बांधकामास भाजपा व काँग्रेस हे राजकारण करीत आहेत. नदीलगतच्या गावकऱ्यांचा विरोध असतानाही भाजपा व काँग्रेस हे यास श्रेष्ठतेचा मुद्दा करून बंधारा बांधण्याच अट्टहास असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)