शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

आरक्षणासाठी मुस्लिम समुदायाचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 12:09 AM

मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी गडचांदूर येथील गांधी चौकात सकल मुस्लिम समाज आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने हाजी मुनाफ कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देशेकडो नागरिक सहभागी : सच्चर आयोगानुसार आरक्षण देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी गडचांदूर येथील गांधी चौकात सकल मुस्लिम समाज आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने हाजी मुनाफ कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली धरणे आंदोलन करण्यात आले.मुस्लिम समाज कष्टकरी व प्रामाणिक म्हणून ओळखला जातो. हस्तकला, शेती, शेतमजुरी तसेच विविध लहान व्यवसाय करून उदरनिर्वाह करतो. मात्र सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास न झाल्याने आजही मागासलेपणा कायम आहे. मुस्लिम समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक मागासलेपणाचा लेखाजोखा न्यायमूर्ती सच्चर समितीने सरकारपुढे ठेवला. या अहवालात मुस्लिम समाज किती मागासला आहे, याबद्दलची माहिती सरकारला देण्यात आली आहे. या आधारावर मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे, न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा व न्यायमूर्ती सच्चर या दोन आयोगांनी मागासलेपणा सिद्ध केला. संविधानातील कलम १४, १५ व १६(४) नुसार महाराष्ट्रातील मागासवर्गीय मुस्लिमांना विशेष मागास प्रवर्ग (अ) निर्माण करून फक्त ५ टक्के आरक्षण सरकारने ९ जुलै २०१४ ला प्रदान केले होते. उच्च न्यायालयाने शैक्षणिक आरक्षण देण्याचे मान्य केले. परंतु सरकारने तेही दिले नाही. प्रशासकीय सेवेतील आरक्षण रद्द झाले. ही त्रुटी सुधारून शिक्षण व प्रशासकीय सेवेत आरक्षण द्यावे, विद्यार्थ्यांना स्वतंत्र वसतिगृह, मुस्लिम समाजाला अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण व बेरोजगारांना व्यवसायासाठी कर्ज देण्याच्या आदी मागण्या तहसीलदार हरिश गाडे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आल्या.

टॅग्स :Muslimमुस्लीमreservationआरक्षण