आबादी वसाहतधारकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By Admin | Updated: March 29, 2015 01:14 IST2015-03-29T01:14:07+5:302015-03-29T01:14:07+5:30
देवई गोविंदपूर तुकूम येथील आबादी वसाहतधारकांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे.

आबादी वसाहतधारकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
चंद्रपूर : देवई गोविंदपूर तुकूम येथील आबादी वसाहतधारकांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे. यासंदर्भात वसाहत धारकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसकर यांना निवेदन देवून त्यांच्याशी चर्चा केली.
दे.गो. तुकूम येथील सर्व्हे नं. १०६ व १०६/१ ही जागा मिनाई आबादी क्षेत्रात समाविष्ट असून ती लोकांना राहण्याकरिता मिळाली आहे. या क्षेत्रातील भूखंडधारक ग्रामपंचायतीच्या अस्तित्वापुर्वीपासून वहिवाट करित आहे. त्यानंतर १९८२ मध्ये हे क्षेत्र चंद्रपूर नगर पालिकेमध्ये व २०११ पासून महानगरपालिकेमध्ये अंतर्भूत करण्यात आले आहे. संबंधित रहिवाशांकडे १९५५-५६ ते १९६०-६१ पर्यंतच्या तलाठी ५ वर्षाचा खसरा उपलब्ध आहे. २४ एप्रिल १९८१ च्या सभेत रहिवाशांनी राहत्या जागेचे पट्टे मिळण्याबाबतचा ठराव संबंधित अधिकाऱ्यांना पाठविला होता. तशी माहिती केंद्रीय रसायन खते राज्यमंत्री हंसराज अहीर व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून देण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. याबाबत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी चंद्रपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती देवराव भोंगळे, शैलेंद्र बैस, उज्ज्वल धामनगे, कृती समितीचे पदाधिकारी लक्ष्मण लेनगुरे, अशोक संगीडवार, शंकर कामावार, महादेव नन्नावरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)