बल्लारपूर ते बामणी महामार्गावरील रस्त्याची दुरुस्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:19 IST2021-06-20T04:19:54+5:302021-06-20T04:19:54+5:30

फोटो बल्लारपूर : बल्लारपूर ते बामणी महामार्ग अत्यंत खराब झाला असून, जागोजागी खड्डे पडलेले आहेत. ज्या ठिकाणी महामार्गावर रस्त्याचे ...

Repair the road from Ballarpur to Bamni Highway | बल्लारपूर ते बामणी महामार्गावरील रस्त्याची दुरुस्ती करा

बल्लारपूर ते बामणी महामार्गावरील रस्त्याची दुरुस्ती करा

फोटो

बल्लारपूर : बल्लारपूर ते बामणी महामार्ग अत्यंत खराब झाला असून, जागोजागी खड्डे पडलेले आहेत. ज्या ठिकाणी महामार्गावर रस्त्याचे कटिंग केलेले आहे, तेथे मोठ्या भेगा पडलेल्या असून छोटे-मोठे अपघात घडत आहेत. रस्त्याच्या बाजूचा भाग दबलेला असून, वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. पाइपलाइनमुळे तयार झालेले खड्डे मोठ्या प्रमाणात असून, प्रशासन अपघाताची वाट तर बघत नाही ना, असा प्रश्न निर्माण होतो. सदर महामार्गावरील रस्ता तत्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी निवेदनाद्वारे केली.

ही मागणी तत्काळ पूर्ण केली गेली नाही तर वंचित बहुजन आघाडी सदर रस्त्यावरील खड्ड्यात बेशरमाचे झाड लावून प्रशासनाचा जाहीर निषेध करेल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीद्वारे देण्यात आला. निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे, संपत कोरडे, मंगेश सोनवणे, जाकीर खान, स्नेहल साखरे, अनिरूप पाटील, प्रदीप झामरे, अखिल शेंडे तथा वंचित बहुजन आघाडीचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

===Photopath===

190621\1519-img-20210619-wa0010.jpg

===Caption===

बल्लारपूर ते बामणी महामार्गावरील रस्त्याची दुरुस्ती करा :- वंचित बहुजन आघाडी ची मागणी

Web Title: Repair the road from Ballarpur to Bamni Highway