शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

पोंभुर्णा तालुका प्रभारीच्या भरवशावर

By admin | Updated: June 4, 2014 23:40 IST

पोंभुर्णा तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, उपअधीक्षक भुमि अभिलेख अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी आदी महत्वाची पदे दोन वर्षांपासून रिक्त आहे. या पदांचा कारभार प्रभारांच्या

देवाडा (खुर्द) : पोंभुर्णा तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, उपअधीक्षक भुमि अभिलेख अधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी आदी महत्वाची पदे दोन वर्षांपासून रिक्त आहे. या पदांचा कारभार प्रभारांच्या भरवश्यावर चालविला जात आहे. त्यामुळे अनेक कामे खोळंबली आहे.तालुक्यातील ३२ ग्रामपंचायती व ७१ खेडेगावातील डोलारा या तालुक्यावर असुन तालुका निर्मीतीला आजतागायत १५ वर्षाचा कालावधी झाला. तालुक्याचा परिसर मात्र अविकसित आहे. त्यातच याठिकाणी महत्वाची पदे रिक्त असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे  स्थानिक विकास कार्यानाही खीळ बसली आहे.पोंभुर्णा कृषी कार्यालयामध्ये पुर्वी कार्यरत असलेले मंडळ अधिकारी शेले व गोंडपिपरीचे मुंधडा यांच्याकडे सदर पदाचा कारभार सोपविण्यात आला. परंतु मुंधडा यांची इतरत्र बदली झाल्याने मूल येथील पर्यवेक्षक गायकवाड यांच्याकडे प्रभारी कृषी अधिकारी म्हणून काम सोपविण्यात आले. परंतु दोन वर्षाचा कालावधी होवून सुद्धा याठिकाणी स्वतंत्र कृषी अधिकारी देण्यात आला नाही. या परिसरातील शेतकर्‍यांचा मुख्य व्यवसाय शेती असुन शेतकर्‍यांना आपल्या शेती विषयक समस्या घेऊन नेहमी या कार्यालयात कामासाठी जावे लागते. परंतु येथील कारभार प्रभारीच्या भरवश्यावर चालत असल्याने  मूल येथील प्रभारी कृषी अधिकारी गायकवाड हे याठिकाणी फारसा वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे येथील कार्यरत कर्मचार्‍यांवर त्यांचा वचक नाही. तालुक्यातील शेतकरी शेती विषयक कामासाठी कार्यालयात गेले असता. कार्यालयात शुकशुकाट असतो. त्याठिकाणी रिकामे टेबल व खुर्ची बघायला मिळते. अशी परिस्थिती गेल्या दोन वर्षांपासून या कार्यालयात बघायला मिळत असल्याचे परिसरातील नागरिकांकडून बोलल्या जात आहे. तर अनेक शेतकरी शासनाकडून कृषी विभागामार्फत मिळणार्‍या विविध योजनापासून वंचित आहेत. यावर्षीच्या अतिदृष्टीने परिसरातील शेतकर्‍याची प्रचंड नुकसान झाली. नदी, नाल्या काठावरील जमीन खरडून गेली. शेतकरी हवालदिल झाला. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. परंतु सदर शेतकर्‍यांना कृषी विभागाकडून पाहिजे त्या प्रमाणात मदत मिळाली नाही. त्यामुळे पुढील उत्पादन घेणे त्यांना कठीण झाले आहे. येथील कृषी अधिकार्‍याचे पद रिक्त असल्याने विकास कामातही अडचणी येत आहेत. प्रभारी अधिकारी वेळ देऊ शकत नसल्याने याठिकाणी त्वरीत कृषी अधिकारी देण्यात यावा. तसेच या ठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून उपअधीक्षक भुमि अभिलेख अधिकारी हे पद सुद्धा प्रभारीच्या भरवश्यावर असल्याने ते याठिकाणी क्वचितच येत असतात. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांना आपल्या शेतजमिनी विषयक समस्यांना नेहमी अडचणीला तोंड द्यावे लागत असते. तालुक्याचे सदर पद सुद्धा शेतकर्‍यांना दृष्टीकोनातून फार महत्वाचे असल्याने याठिकाणी स्वतंत्र उपअधीक्षक भुमि अभिलेख अधिकारी त्वरित देण्यात यावे. परिसरातील शेतकर्‍यांना आपले काम करण्यास अडचण निर्माण होणार नाही. गेल्या आठ महिण्यापासून याठिकाणी बालविकास प्रकल्प अधिकारी नसल्याने त्यांचा प्रभार येथील कार्यरत संवर्ग विकास अधिकारी अनिल चापडे यांच्याकडे असल्याने त्यांच्यावर पंचायत समिती समितीचाच संपूर्ण कार्यभाराचा ताण असल्याने ते पाहिजे त्या प्रमाणात वेळ देत नाही. एकंदरीत संबंधित विभागामध्ये स्वतंत्र अधिकारी नसल्याने या समस्या तालुक्यामध्ये दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे याचा विपरीत परिणाम तालुका विकासावर होत असुन तालुका अनेक समस्यांच्या विळख्याने सापडला आहे. संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधीनी या तालुक्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी  केली आहे.  (वार्ताहर)