जिल्हा बँकेच्या कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभागृहाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 23:30 IST2018-01-02T23:30:21+5:302018-01-02T23:30:58+5:30
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात नववर्षानिमित्त सोमवारी कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभागृह नुतनीनकरणाचे लोकार्पण बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांच्या हस्ते पार पडले.

जिल्हा बँकेच्या कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभागृहाचे लोकार्पण
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात नववर्षानिमित्त सोमवारी कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभागृह नुतनीनकरणाचे लोकार्पण बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बँकेचे संचालक अनिल खनके, संदीप गड्डमवार, प्रा. ललीता मोटघरे, चंद्रकांत गोहोकार, डॉ. विजय देवतळे, उल्हास करपे, रवींद्र शिंदे, दामोधर रुयारकर, श्रीपाद पाटील, संचालिका प्रभा वासाडे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांनी, बँकेचे प्रशस्त सभागृह तयार झाले असून कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभागृहाचा उपयोग बँकेचे कर्मचारी व अधिकारी यांना प्रशिक्षण देण्याकरिता व्हावे, असे मत व्यक्त केले. तसेच उपस्थित सर्व संचालकांनी कर्मचाऱ्यांकडून उत्कृष्ट कार्याकरिता प्रशिक्षणाची गरज लक्षात घेवून अद्यावत सोईयुक्त सभागृह तयार करण्यात आल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी एम. व्ही. पोटे यांनी केले. आभार व्यवस्थापक ए. बी. मोरे यांनी मानले. कार्यक्रमाला बँकेचे अधिकारी व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
सोयीचे प्रशिक्षण
मुख्य शाखेत सर्वसुविधायुक्त सभागृह बांधकामामुळे आता कर्मचाऱ्यांना सोयीचे प्रशिक्षण मिळणार आहे. कर्मचाºयांची होणारी हेळसांड आता थांबणार आहे.