नवीन वर्षातही शैक्षणिक सहलींना ‘रेड सिग्नल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2022 05:00 IST2022-01-02T05:00:00+5:302022-01-02T05:00:20+5:30

सध्या ऑफलाईन शाळा, महाविद्यालये सुरू झालेली आहेत. परंतु सांस्कृतिक कार्यक्रम, सहलीची प्रतीक्षा कायम आहे. सहलीच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. शैक्षणिक सहल, अभ्यास सहल व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत शालेय शिक्षण विभागाकडून अद्याप सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. सद्य:स्थितीत ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सहलींना परवानगी मिळणे कठीण आहे.

'Red signal' for educational trips in New Year too | नवीन वर्षातही शैक्षणिक सहलींना ‘रेड सिग्नल’

नवीन वर्षातही शैक्षणिक सहलींना ‘रेड सिग्नल’

दीपक साबने
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : मागील वर्षी कोरोनामुळे आणि या नवीन वर्षात ओमायक्रॉनमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली ठप्प झाल्या आहेत. डिसेंबरमध्ये नियोजन झाले नाही, तर नवीन वर्षात जानेवारीत सहलीचे नियोजन होईल याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष होते. मात्र शालेय शिक्षण विभागाकडून सहलीबाबत निश्चित असे कोणतेच संकेत दिले गेले नाहीत. सहलीच्या आयोजनाबाबत संभ्रम अवस्था कायम असून, मागील दोन वर्षांपासून घरात अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांच्या सहलीच्या आनंदावर या नवीन वर्षातही ओमायक्रॉनमुळे विरजण पडल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.
मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा ऑक्टोबरमध्ये सुरू झाल्या. ऑफलाईन वर्गामध्ये सुरुवातीला पहिली सत्र परीक्षा घेण्यात आली. 
काही शाळांमध्ये दिवाळी सुटीनंतर उर्वरित परीक्षा घेण्यात आल्या. सर्वसाधारणपणे डिसेंबर महिन्याच्या आधी सहलीचे नियोजन करणे आवश्यक असते. परंतु शासकीय परीक्षा व इतर शैक्षणिक कामकाज यामुळे सहलीचा कालावधी जानेवारीपर्यंत वाढत जातो.
साधारणपणे दुसऱ्या सत्रामध्ये डिसेंबर, जानेवारीत सहलीचे आयोजन केले जाते. विद्यार्थी व शिक्षक यांना सहलीला जाऊन आल्यावर पुढील अभ्यासासाठी नवी ऊर्जा मिळावी म्हणून पर्यटन, निसर्गरम्य, ऐतिहासिक, धार्मिक स्थळे इत्यादी ठिकाणी सहली घेऊन जातात. सध्या ऑफलाईन शाळा, महाविद्यालये सुरू झालेली आहेत. परंतु सांस्कृतिक कार्यक्रम, सहलीची प्रतीक्षा कायम आहे. सहलीच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे.

शैक्षणिक सहल, अभ्यास सहल व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत शालेय शिक्षण विभागाकडून अद्याप सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. सद्य:स्थितीत ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सहलींना परवानगी मिळणे कठीण आहे.
- चरणदास कोरडे, विस्तार अधिकारी (शिक्षण), पं. स. जिवती.

 

Web Title: 'Red signal' for educational trips in New Year too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.