साईबाबा बहुउद्देशीय संस्थेतर्फे तृतीयपंथीयांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:25 IST2021-03-15T04:25:54+5:302021-03-15T04:25:54+5:30
चंद्रपूर : साईबाबा बहुउद्देशीय शिक्षण संस्था पेंढरी मक्ताच्या वतीने तृतीयपंथीयांचा सत्कार करण्यात आला. १५ एप्रिल २०१४ रोजी सुप्रिम कोर्टाने ...

साईबाबा बहुउद्देशीय संस्थेतर्फे तृतीयपंथीयांचा सत्कार
चंद्रपूर : साईबाबा बहुउद्देशीय शिक्षण संस्था पेंढरी मक्ताच्या वतीने तृतीयपंथीयांचा सत्कार करण्यात आला. १५ एप्रिल २०१४ रोजी सुप्रिम कोर्टाने तृतीयपंथी म्हणून मान्यता दिली. परंतु, अद्यापही त्यांना समाजाने स्वीकारले नाही. वेळोवेळी त्याचा अपमान व तिरस्कार करण्यात येतो. त्याना मानाचे स्थान देण्यात यावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मार्गदर्शन करताना संस्थेच्या अध्यक्ष नंदा अल्लूरवार म्हणाल्या, तृतीयपंथीयांना समाजाने सन्मानाची वागणूक द्यावी, त्यांना हिणवणे बंद करावे, असे आवाहन करत त्यांनी तृतीयपंथीयांसोबत घडलेले चांगले अनुभव कथन केले. यावेळी तृतीयपंथीयांचा साडी व चोळी व धान्य देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तृतीयपंथीयांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जि. प. शाळेच्या शिक्षिका सरिता ठोंदरे, कवयित्री मंदा पडवेकर, सोनुले, श्रीकांत ठोंदरे आदी उपस्थित होते.