संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त सत्कार समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:34 IST2021-02-25T04:34:49+5:302021-02-25T04:34:49+5:30

विसापूर : येथील वरठी, परीट, धाेबी समाज संघटनेच्यावतीने संत गाडगेबाबा जयंती दिनाचे औचित्य साधून विसापूर ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत ...

Reception on the occasion of Sant Gadge Baba Jayanti | संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त सत्कार समारंभ

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त सत्कार समारंभ

विसापूर : येथील वरठी, परीट, धाेबी समाज संघटनेच्यावतीने संत गाडगेबाबा जयंती दिनाचे औचित्य साधून विसापूर ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला.

यावेळी वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मालार्पण करून अभिवादन केले.

विसापूर येथील वरठी, परीट, धाेबी समाजाच्यावतीने संत गाडगेबाबा जयंतीदिनाचे औचित्य साधून गावातील स्वच्छता अभियान राबविले. यावेळी विसापूरचे सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, सुरज टाेमटे, रिना कांबळे, गजानन पाटणकर, हर्षला टाेंगे, वैशाली पुणेकर, सुनील राेंगे, प्रदीप गेडाम, सुरेखा इटनकर, दिलदार जयकर, विद्या देवाळकर, शशिकला जीवने, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष माराेतराव गावंडे, भाऊराव तुंबडे, दादाजी क्षीरसागर, शालिक नांदे, पांडुरंग धांडे, संतोष निपुंगे, अशाेक ठुणेकर यांचा शाल, पुस्तक व पुष्प प्रदान करून सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी वसंत भाेजेकर, मनाेज काकडे, जनार्दन काकडे, रेखा क्षीरसागर, संध्या तुराणकर, अनुसया राजूरकर, कवडू नाकाडे, छाया धांडे, कविता क्षीरसागर, विनायक काळे, क्रांतिकुमार भाेजेकर यांची उपस्थिती हाेती.

Web Title: Reception on the occasion of Sant Gadge Baba Jayanti