रविना टंडन वीरा आणि तिच्या बछड्यांच्या प्रेमात; ताडोबात मैत्रिणींसह दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2023 08:00 IST2023-06-18T08:00:00+5:302023-06-18T08:00:06+5:30

Chandrapur News शनिवारी सिनेअभिनेत्री रविना टंडन, टीव्ही स्टार करिश्मा, सरोज व मैत्रिणींसह ताडोबात दाखल झाल्या. त्यांनी बेलारा गोंडमोहाळी गेटवरून सफारी केली. या गेटची महाराणी वाघीण वीरा आणि तिच्या दोन बछड्यांचे दर्शन झाल्याने त्या हरखून गेल्या.

Raveena Tandon in love with Veera and her calves; Filed with girlfriends | रविना टंडन वीरा आणि तिच्या बछड्यांच्या प्रेमात; ताडोबात मैत्रिणींसह दाखल

रविना टंडन वीरा आणि तिच्या बछड्यांच्या प्रेमात; ताडोबात मैत्रिणींसह दाखल

विकास खोब्रागडे

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाची झलक बघण्यासाठी सेलिब्रिटी, राजकीय दिग्गज, सिनेसृष्टीतील कलाकार, जगप्रसिद्ध खेळाडू येतात. शनिवारी सिनेअभिनेत्री रविना टंडन, टीव्ही स्टार करिश्मा, सरोज व मैत्रिणींसह ताडोबात दाखल झाल्या. त्यांनी बेलारा गोंडमोहाळी गेटवरून सफारी केली.

या गेटची महाराणी वाघीण वीरा आणि तिच्या दोन बछड्यांचे दर्शन झाल्याने त्या हरखून गेल्या. मोठ्या पडद्यावर एक काळ गाजवणारी अभिनेत्री रविना टंडन यांची एक झलक बघण्यासाठी चाहते जीवाचे रान करतात. त्यांना प्रत्यक्ष पाहून गाईडही हरखून गेले, त्यांना सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी बेलारा गोंडमोहाळी गेटवर गाइड किशोर तोडसे, अजित अलोने, अनिल धुर्वे, विशाल गुरनुले, अभिषेक गुरनुले, मयूर गावतुरे, संदीप पेटकुले, धर्मपाल जीवतोडे, सुरेश राऊत, परमानंद गुरनुले आदी उपस्थित होते.

Web Title: Raveena Tandon in love with Veera and her calves; Filed with girlfriends