तुकूम येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्मरण कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:52 IST2020-12-17T04:52:09+5:302020-12-17T04:52:09+5:30
चंद्रपूर : ग्रामगीता गुरुदेव सेवा मंडळ तुकुम चंद्रपूर शाखेच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन ...

तुकूम येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्मरण कार्यक्रम
चंद्रपूर : ग्रामगीता गुरुदेव सेवा मंडळ तुकुम चंद्रपूर शाखेच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .एक दिवसीय कार्यक्रमात सामुदायिक ध्यानपाठ, परिसरातील स्वच्छता अभियानानंतर सुमित्रा नगर, द्वारका नगरी, खनके लेआऊट येथील महिला शाखेच्या वतीने राष्ट्रसंताच्या प्रबोधनपर भजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर सायंकाळी श्रद्धांजली, सामुदायिक प्रार्थना, आरती, राष्ट्रवंदना , जयघोष घेऊन कार्यक्रम समाप्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या निमित्ताने बंडोपंत बोढेकर , सुभाष कासनगोटटुवार यांची भाषणे झालीत. प्रमुख अतिथी म्हणून मध्यवर्ती प्रतिनिधी विजय चिताडे , ग्रामसेवाधिकारी धर्माजी खंगार, ह.भ.प.आण्याजी ढवस , पुरुषोत्तम सहारे, मंजुश्री कासनगोट्टूवार, वृषाली धर्मपुरीवार, प्रतिभा रोकडे , प्रज्ञा गंदेवार उपस्थित होते.
शाखेचे गोकुलदास पिंपळकर, मारोती राजुरकर, ॲड.वासुदेव खेळकर, नानाजी सरोदे, अंकुश पायघन, चंद्रभान बेसेकर, लहु पायघन, बाबुराव ढवळे, ज्योती आस्कर, माधुरी बोडेकर, कामीनी वैरागडे, संगिता खंगार, रेखा काकडे, शारदा उताने, तारा राजुरकर, नंदा पिंपळकर, विणा खेळकर, लता डोके, ज्योती भेंडाळे, सरोदे, मोरे, ममता गटलेवार, बलकी आदींनी मोलाचे सहकार्य केले. प्रास्ताविक आण्याजी ढवस, संचालन विजय चिताडे व आभार धर्माजी खंगार यांनी मानले.