रणजीत डवरे यांना पक्षप्रतारणा पडली महागात
By Admin | Updated: May 12, 2016 01:02 IST2016-05-12T01:02:14+5:302016-05-12T01:02:14+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाकरिता १० मे रोजी निवडणूक झाली.

रणजीत डवरे यांना पक्षप्रतारणा पडली महागात
हकालपट्टीचा निर्णय : पदासाठी दिली काँग्रेसला साथ
चंद्रपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाकरिता १० मे रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीत आरवट गट ग्रामपंचायतीचे उपसरपंच रणजीत डवरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेच्या विरोधात जावून दुसऱ्या पक्षाशी हात मिळवणी केली. त्यामुळे रणजीत डवरे यांना भारतीय जनता पक्षातून पुढील ६ वर्षाकरिता निलंबित करण्यात आले आहे.
चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक १७ एप्रिल रोजी पार पडली. या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत सदस्य गटातून रणजीत डवरे हे भारतीय जनता पार्टी समर्थीत पॅनलतर्फे ग्रामपंचायत गटातून बाजार समिती सदस्य म्हणून निवडून आले होते. १० मे रोजी झालेल्या निवडणुकीत रणजीत डवरे यांनी पक्षाच्या भुमिकेच्या विरोधात जावून काँग्रेस पक्षाशी हात मिळवणी केली. त्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित केल्याची माहिती चंद्रपूर भाजपा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी दिली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)