शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

राणी हिराईची जलनीती राजकर्त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारी!

By राजेश मडावी | Updated: April 19, 2023 17:41 IST

जयंतीदिन विशेष : ..तर टळले असते जलसंकट; गोंडकालीन जलधोरणे कालबाह्य ठरविण्याचा सपाटा

चंद्रपूर : लोककल्याणाची कळकळ, बुद्धिचातुर्य व उत्कृष्ट प्रशासन कौशल्याने चंद्रपूरच्या गोंड राजवटीत ठसा उमटविणाऱ्या राणी हिराईची जलनीती आजच्या राजकर्त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे. मात्र, गोंडकालीन जलधोरणांना कालबाह्य ठरविण्याची कृतघ्न परंपरा सुरूच ठेवल्याने चंद्रपुरातील पिण्याची पाण्याची समस्या अद्याप दूर झाली नाही.

चंद्रपूरच्या तत्कालीन गोंड राजसत्तेत २० पेक्षा अधिक राजे होऊन गेले. राणी हिराईचे सर्वोच्च स्थान आहे. प्रजेशी सुसंवाद ठेवून अत्यंत प्रतिकूल परिस्थिती राणीने केलेल्या विकासकामांचे स्वरूप इतिहासकारांच्या आकर्षणाचा विषय आहे. राणी हिराईने चंद्रपुरात केलेले विधायक कार्य विशेषत: पाणी प्रश्नाबाबत १६ व्या शतकातील सुधारणा आजही चार पाऊल पुढे असल्याचे दिसून येते.   राणी हिराईची दूरदृष्टी

१५ व्या शतकात राजा खांडक्या बल्लाळशाहाने १५८ एकरमध्ये रामाळा तलाव तयार करून चंद्रपूरच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. राणी हिराईने पती राजा वीरशहा यांच्या हत्येनंतर दत्तकपुत्र रामशहा यास बसवून राणीने राज्य केले. आपल्या कार्यकाळात केवळ मंदिरांचा जीर्णोद्धार केला नाही तर अनेक सुंदर वास्तू बांधल्या. जलसंकट दूर केले. रामशहाने तलावाचा विकास केला. रामशहाच्या नावावरूनच ‘रामाळा’ असे नाव झाले. शहरातील बावड्यांचे (विहिरी) स्वरूप तर आजही आधुनिक वाटावे असे आहे. पण, प्रशासनाला त्यांचा सांभाळ करता आला नाही.

‘त्या’ १३ हतनींचे काय झाले ?

रामाळा तलावातून चंद्रपूरकरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी गोंड राजांनी शहरात १३ हतनी (आजच्या भाषेत नळ पाइपलाइन) बांधल्या होत्या. राणी हिराईने या हतनींची उत्तम काळजी घेतली होती. भानापेठ वॉर्ड, रघुवीर बालक मंदिर, अंचलेश्वर वॉर्ड, कस्तुरबा शाळा, जेल सुरक्षाभिंत, सोमेश्वर मंदिर, दादमहल महल वार्ड, कस्तुरबा चौक, गोलबाजार परिसरातील हतनी नष्ट झाल्या. या हतनींच्या विस्तारावरून राणीचा जलदृष्टिकोन प्रतीत होतो.

टॅग्स :Socialसामाजिकchandrapur-acचंद्रपूरhistoryइतिहास