आमदार निधीतून राजुरात स्वर्गरथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:29 IST2021-07-27T04:29:15+5:302021-07-27T04:29:15+5:30

राजुरा : नगर परिषद राजुराच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन राजुरा शहरातील नागरिकांसाठी आमदार सुभाष धोटे यांनी आपल्या आमदार निधीतून ...

Rajwarat Swargarath from MLA fund | आमदार निधीतून राजुरात स्वर्गरथ

आमदार निधीतून राजुरात स्वर्गरथ

राजुरा : नगर परिषद राजुराच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन राजुरा शहरातील नागरिकांसाठी आमदार सुभाष धोटे यांनी आपल्या आमदार निधीतून १५ लाख रुपये निधी मंजूर करून येथे स्वर्गरथ उपलब्ध केला.

या स्वर्गरथाचे लोकार्पण नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी स्वर्गरथाचे चालक सिडाम यांच्याकडे चावी सुपूर्द करून केले. राजुरा शहराच्या विकासासाठी आपण कटिबध्द असून, शहर विकासासाठी आपण सर्वांना सोबत घेऊन सातत्याने पाठपुरावा करीत आलो आहे. शहरातील नागरिकांना अंत्ययात्रेसाठी स्वर्गरथाची आवश्यकता होती. ही बाब लक्षात घेऊन आ. सुभाष धोटे यांनी येथे स्वर्ग रथ उपलब्ध करून दिला. यामुळे शहरातील नागरिकांची गैरसोय आता दूर होईल, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे सिनेट सदस्य अजय बतकमवार, अरविंद लांडे उपस्थित होते.

260721\img-20210724-wa0147.jpg

फोटो

Web Title: Rajwarat Swargarath from MLA fund