शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा क्षेत्रात होणार बलाढ्य लढत

By admin | Updated: October 11, 2014 23:02 IST

राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये बलाढ्य लढत होण्याचे संकेत आहेत. एकंदर राजुरा विधानसभा क्षेत्र एका बलाढ्य लढतीकडे

बी.यू.बोर्डेवार - राजुराराजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये बलाढ्य लढत होण्याचे संकेत आहेत. एकंदर राजुरा विधानसभा क्षेत्र एका बलाढ्य लढतीकडे वाटचाल करताना दिसत आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रात १९६२ नंतर तब्बल ५२ वर्षांनी काँग्रेसचे सुभाष धोटे आणि भारतीय जनता पक्षाचे अ‍ॅड. संजय धोटे हे आमने- सामने आले आहेत. १९६२ च्या राजुरा विधानसभेच्या निवडणुकीत या क्षेत्रात तुल्यबळ लढत झाली. काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांचे काका विठ्ठलराव धोटे यांना २२ हजार ८१८ मते मिळाली, तर भाजपाचे उमेदवार अ‍ॅड.संजय धोटे यांचे वडील यादवराव धोटे यांना २२ हजार ७४५ मते मिळाली होतीे. १९६२ च्या निवडणुकीत विठ्ठलराव धोटे केवळ ७३ मतांनी विजयी झाले होते. राजुरा विधानसभा क्षेत्रातील १९६२ पासून झालेल्या ११ लढतीमध्ये सहावेळा काँग्रेसने बाजी मारली तर दोन वेळा जनता दल, दोन वेळा शेतकरी संघटना तर एक वेळा अपक्ष उमेदवार निवडून आला. १९६७ मध्ये अपक्ष उमेदवार श्रीहरी जीवतोडे यांनी काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. विठ्ठलराव धोटे यांना तीन हजार ९१४ मतांनी पराभूत केले होते.राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये मागील ५२ वर्षांत अनेक बलाढ्य लढती झाल्या. १९८० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रभाकरराव मामुलकर यांनी भाजपाचे प्रभाकरराव धोटे यांना १४ हजार २३४ मतांनी पराभूत केले होते. प्रभाकरराव मामूलकर यांना ३६ हजार २३५ मते मिळाली, तर भाजपाचे प्रभाकरराव धोटे यांना २२ हजार १ मते प्राप्त झाली होती. १९९९ मध्ये प्रथमच या क्षेत्राचे शेतकरी संघटनेचे उमेदवार अ‍ॅड.वामनराव चटप यांना काँग्रेसचे सुदर्शन निमकर यांनी सात हजार ४८३ मतांनी पराभूत केले. सुदर्शन निमकर यांना ५० हजार ६५४ मते मिळाली, तर शेतकरी संघटनेचे अ‍ॅड. वामनराव चटप यांना ४३ हजार १७१ मते मिळाली होती. २००९ मध्ये काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांनी शेतकरी संघटनेकडून उभे असलेले अ‍ॅड. संजय धोटे यांना १६ हजार ८७ मतांनी पराभूत केले होते. मधल्या काळात येथील राजकारणात बरीच उलथापालथ झाली. शेतकरी संघटनेचे अ‍ॅड. संजय धोटे भाजपात गेले. शेतकरी संघटनेचे अ‍ॅड. वामनराव चटप आम आदमी पार्टीत जाऊन पुनन्हा स्वगृही परतले. माजी आमदार सुदर्शन निमकर काँग्रेस सोडून राष्ट्रवादी गेले. सध्याच्या राजकारणात साम-दाम- दंड भेद या आयुधांचा सडेतोड वापर होत आहे. या निवडणुकीत राजुरा विधानसभेसाठी १६ उमेदवार रिंगणात असून काँग्रेसचे सुभाष धोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, सुदर्शन निमकर, भाजपाचे उमेदवार अ‍ॅड. संजय धोटे यांच्यात लढत होण्याची चिन्हे आहेत. आंबेडकर राईट पार्टी आॅफ इंडियाचे उमेदवार उद्धव नारनवरे, राष्ट्रीय बहुजन काँग्रेस पार्टीचे उमेदवार प्रवीण निमगडे, अखिल हिंद फारवर्ड ब्लॉकचे उमेदवार शोभा मस्के, गोंडवाना गणतंत्र पक्षाचे उमेदवार सुधाकर किन्नाके, अपक्ष उमेदवार अरुण वासलवार, विद्यासागर कासर्लावार, सटवा थोरात, प्रेमदास मेश्राम, मदन बोरकर असे १६ उमेदवार आपले नशिब आजमावित आहेत.