राजोलीत एप्रिलपासून रहदारी नाका व गुजरी वसुली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:28 IST2021-03-31T04:28:10+5:302021-03-31T04:28:10+5:30
एप्रिलपासून रहदारी नाका आणि गुजरी वसुली बंद राजोली ग्रामपंचायतीचा निर्णय राजोली : येथील ग्रामपंचायतीने १ एप्रिलपासून रहदारी नाका ...

राजोलीत एप्रिलपासून रहदारी नाका व गुजरी वसुली बंद
एप्रिलपासून रहदारी नाका आणि गुजरी वसुली बंद
राजोली ग्रामपंचायतीचा निर्णय
राजोली : येथील ग्रामपंचायतीने १ एप्रिलपासून रहदारी नाका आणि दैनंदिन गुजरीची वसुली बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. चालू आर्थिक वर्षात याचे लिलाव रद्द केले आहे. त्यामुळे किरकोळ व्यावसायिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामपंचायतीच्या आर्थिक उत्पन्नात भर पडावी या हेतूने बऱ्याच वर्षांपासून गावात येणाऱ्या जड मालवाहू वाहनावर, दैनंदिन गुजरीतील व्यावसायिकांवर कर आकारले जात होते. सुलभ करवसुलीसाठी लिलाव प्रक्रियेतून कंत्राटदारांची निवड केल्यावर ग्रामपंचायतीने ठरवून दिल्यानुसारच कर आकारणे बंधनकरक आहे. अलीकडील काळात कंत्राटदार वाहनचालकाकडून नियमबाह्य वसुली करीत असल्याच्या तक्रारींत वाढ होऊ लागली होती. त्यामुळे ग्रामपंचायतीने एप्रिलपासून रहदारी नाका व दैनंदिन गुजरीची करवसुली बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.