महानगरपालिकेमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:11 IST2021-01-13T05:11:48+5:302021-01-13T05:11:48+5:30
चंद्रपूर : शहर महानगरपालिकेच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पमाला अर्पण ...

महानगरपालिकेमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती
चंद्रपूर : शहर महानगरपालिकेच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी महापौर कंचर्लावार म्हणाल्या महाराष्ट्राचे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे स्वराज्य रक्षणात अतुल्य योगदान होते. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य रक्षणाचे बाळकडू पाजून त्यांना सक्षम करण्याची राजमाता जिजाऊंची शिकवण महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. स्वामी विवेकानंदाचे विचार आजही तेवढेच सत्य व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी मनपा आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त संतोष कंदेवार, मनोज गोस्वामी, जनसंपर्क अधिकारी युधिष्ठिर रैच, सुरेश माळवे, प्रदीप पाटील, विकास दानव, गुरुदास नवले व मनपाचे कर्मचारी उपस्थित होते.