शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
2
आजचे राशीभविष्य १० जानेवारी २०२६ : धनु राशीला पदोन्नतीचे योग, तर तूळ राशीने राहावे सतर्क; वाचा काय सांगते तुमचे नशीब!
3
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
4
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
5
विचारसरणी सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
6
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
7
अजित पवारांची मिळाली साथ; अंबरनाथमध्ये शिंदेसेनेने भाजपचे ‘सत्तास्वप्न’ लावले उधळून
8
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
9
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
10
ईडीविरोधात तृणमूल संतप्त, खासदारांची दिल्लीत निदर्शने; ८ खासदार पोलिसांच्या घेतले ताब्यात
11
आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ
12
सत्ताधाऱ्यांचे ‘विकासा’चे तर विरोधकांचे ‘बदल हवा’; ठाण्यात ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेनेचे बॅनर
13
राज्यात आचारसंहिता भंगाच्या १८६ तक्रारी, ८ कोटी जप्त केले; ३८ गुन्हे नोंदविण्यात आले
14
तीन वर्षांत किती बांगलादेशींना पकडून मायदेशी परत पाठवले? काँग्रेसचा सवाल; भाजपचा दावा फसवा
15
कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई
16
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
17
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
18
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
19
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
20
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वडेट्टीवारांचे कट्टर समर्थक राजीव रेड्डी हेच अखेर नगर परिषद उपाध्यक्षपदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 20:32 IST

बड्या नेत्याला हादरा : दीप्ती सोनटक्के नगराध्यक्षपदी विराजमान

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घूस : नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत असताना उपाध्यक्ष पदाच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये अंतर्गत घमासान बघायला मिळाले. अखेर पक्षनिष्ठा बाळगून असलेले नवनिर्वाचित नगरसेवक राजीव रेड्डी यांचीच बुधवारी झालेल्या निवडणुकीत उपाध्यक्षपदी निवड झाली. निवडणुकीनंतर जल्लोष करण्यात आला. यावेळी काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार प्रामुख्याने उपस्थित होते. या घडामोडीला तीव्र विरोध असलेल्या काँग्रेसच्याच एका बड्या नेत्याला मोठा हादरा बसल्याची चर्चा काँग्रेस गटात सुरू झाली.

राजीव रेड्डी हे काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक असून, घुग्घूसमध्ये त्यांनीच काँग्रेस जिवंत असल्याचाही सूर यावेळी उमटत होता. नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे नगराध्यक्ष आणि २२ पैकी नगरसेवक पदांच्या ११ जागांवर विजय मिळविला होता. या निवडणुकीची सर्वस्वी धुरा राजीव रेड्डी यांच्या खांद्यावर होती. यामुळे रेड्डी यांचीच उपाध्यक्षपदी वर्णी निवड व्हावी, असे एकंदर चित्र निर्माण झाले होते. मात्र काँग्रेसच्याच एका बड्या नेत्याने रेड्डी यांच्या नावाला विरोध दर्शवून दोन नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नगरसेवक रविश सिंग यांना उपाध्यक्षपद द्यावे, असा आग्रह धरला. इतकेच काँग्रेसचा गट स्थापन झाला असताना काँग्रेसच्या काही नगरसेवकांना हाताशी धरून सोमवारी (दि. ५) जिल्हाधिकाऱ्यांकडे काँग्रेसच्या १४ सदस्यांच्या गटातून बाहेर पडत असल्याचे पत्रही दिले होते.

मात्र यात यश न आल्याने व्हीपच्या आधारे अखेर राजीव रेड्डी यांच्या उपाध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला. काँग्रेसकडून राजीव रेड्डी व रोशन पचारे यांनी तर भाजपकडून गणेश पिंपळकर यांनी उपाध्यक्षपदासाठी नामांकन दाखल केले होते. अखेर पचारे यांनी आपले नामांकन मागे घेतले. रेड्डी आणि पिंपळकर यांच्यात लढत होऊन रेड्डी यांनी २३ पैकी १६ मते घेत विजय मिळविला. पक्षातील घडामोडींमुळे आमदार विजय वडेट्टीवार खुद्द घुग्घूसमध्ये दाखल झाले होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Vadettiwar Supporter Rajiv Reddy Elected as Municipal Council Vice-President

Web Summary : Despite internal conflict, Congress loyalist Rajiv Reddy secured the Vice-President post in Ghugghus. Defeating BJP's candidate, Reddy's victory, backed by MLA Vijay Vadettiwar, highlights Congress dominance despite opposition from within the party. Celebrations followed the election.
टॅग्स :Chandrapur Municipal Corporation Electionचंद्रपूर महानगरपालिका निवडणूक २०२६Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारElectionनिवडणूक 2026