रायुकाँचे अर्धनग्न आंदोलन
By Admin | Updated: May 20, 2017 01:20 IST2017-05-20T01:20:34+5:302017-05-20T01:20:34+5:30
बेकोलिचे काम करणाऱ्या कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांच्या शोषणाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने

रायुकाँचे अर्धनग्न आंदोलन
कामगारांच्या शोषणाचा निषेध : कंत्राटी कामगारांची कपात
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बेकोलिचे काम करणाऱ्या कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांच्या शोषणाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण सुरू केले आहे. त्याची दखल न घेतली गेल्याने जिल्हा प्रशासनाचा निषेध म्हणून शुक्रवारी रायुकाँ कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन केले. हे आंदोलन चर्चेचा विषय होते.
या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिÞल्हाध्यक्ष नितीन भटारकर व कामगार नेते सय्यद अनवर यांनी केले. कंत्राटी कामगारांच्या आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषणाच्या विरोधात १६ मेपासून उपोषण सुरू करण्यात आले आहे. वेकोलि अंतर्गत अभिनव कंस्ट्रक्शन कंपनीने गेल्या १० महिन्यांपासून कामगारांच्या हजारों रूपयांची कपात चालविली आहे. केंद्र शासनाच्या वेतनासंदर्भातील परिपत्रकाला अधिकाऱ्यांंच्या संगनमताने केराचीं टोंपली दाखविली आहे. याबाबत विचारणा करणाऱ्या ११ कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरुन काढण्यात आले आहे. याबाबत वेकोलि व जिÞल्हा प्रशासनाला निवेदन दिल्यानंतरही कोणतीही सकारात्मक कार्यवाही करण्यात आली नाही.
अर्धनग्न आंदोलनात आंदोलनात दुगार्पुर ग्रामपंचायतचे सरपंच अमोल ठाकरे, घुग्गुस शहर अध्यक्ष श्रीनिवास गोस्कुल्ला, फैयाज शेख, पंचायत समिति सदस्य पंकज ढेंगारे, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन इंगळे, संजय ठाकूर, सचिन मंडाले, अविनाश जेनेकर, दत्तात्रय रामटेके, चिरंजीव मेडषिल्ल, समय्या पिल्ली, श्याम टीगुटला, उमेश कश्यप, अमित कुंभारे, परमानंद निचकोल, गोविंदराव मूडमगल, नौशाद कुरेशी, रामरूप कैथल, बिट्टू ढोरके, राहुल भगत आदी सहभागी होते.