शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा तोंडावर; संसार उघड्यावर

By admin | Updated: June 13, 2014 00:00 IST

चौदा दिवस लोटून गेले. परंतु अद्यापही गडचांदूर येथील आगग्रस्तांना निवाऱ्यासाठी छत मिळालेले नाही. एकीकडे उन्हाचा पारा वाढत असून दुसरीकडे पावसाळा अगदी तोंडावर आला आहे. अशाच जळालेल्या राखेवर मोडलेली

रत्नाकर चटप - लखमापूरचौदा दिवस लोटून गेले. परंतु अद्यापही गडचांदूर येथील आगग्रस्तांना निवाऱ्यासाठी छत मिळालेले नाही. एकीकडे उन्हाचा पारा वाढत असून दुसरीकडे पावसाळा अगदी तोंडावर आला आहे. अशाच जळालेल्या राखेवर मोडलेली खाट किंवा प्लॉस्टिकची फाडी अंथरुन दिवस काढावे लागत आहे. काहीच शिल्लक न राहिल्याने अंगावर झाकायला कपडे, खायला अन्न आणि आर्थिक पैशाची चणचण मोठ्या प्रमाणात भासत आहे. अचानक दु:ख पदरी पडल्याने महिला व पुरुष अद्यापही दुखातून सावरल्या नसल्याचे दिसत आहे. शेजारी व नातेवाईकाकडून एखादी खाट किंवा प्लॉस्टिक फाडी मागून झाडाच्या सावलीत बसून दिवस काढणे आणि रात्री आपल्या जागेवर मातीवर झोप घेणे अशी दु:खी दिनक्रम या आगग्रस्त कुटुंबियांचा सध्या आहे. घरात भांडी नसल्याने साधा चहाही बनवून पिता येत नसल्याचे नागरिक सांगतात. प्रशासनाने करोडोचे नुकसान दाखविले. परंतु मदत पाहिजे त्या प्रमाणात अद्यापही झालेली नाही. आगीत अंगावरच्या कपड्यासह अंथरुणाचे सर्व साहित्य जळाले. त्यामुळे पांघरायलासुद्धा गोधडी नाही. तप्त उन्हात दिवस काढावे लागत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. लहान मुलांवर याचा मोठा परिणाम होताना दिसून येत आहे. पुन्हा घर उभे करण्यासाठी आर्थिक पुंजी कशी गोळा करावी. आगीत घर उद्ध्वस्त झाल्याने गेल्या १४ दिवसांपासून महिला पुरुष कामावर गेलेले नाही. आज ना उद्या शासनाची मदत पदरी पडेल या आशेत येथील नागरिक दिवस घालवत आहे. पावसाळा तोंडावर असल्याने कधी पाऊस पडेल याचा अंदाज सांगता येणार नाही. त्यामुळे राहण्यापुरते किमान टिनाचे पत्रे, सिमेंट खांब आणि ताटवे देऊन घर उभारण्यासाठी मदत शासनाने करावी, अशी मागणी या आगग्रस्तांनी केली आहे. पावसाळ्यात हाताला काम मिळत नाही. यातच घराची सर्वत्र पडझड झाल्याने घरं उभी करण्यास बराच वेळ जाईल. त्यामुळे आतापर्यंत मदत मिळणे अपेक्षित होते. परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.