शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

ब्रह्मपुरी, नागभीड, चिमूरमध्ये पावसाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 6:00 AM

ब्रम्हपुरीतील बारई तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाच्या पाळीवरून पाणी वाहत होते. सदर पाळीला मोठे भगदाड पडल्याने शहरवासीयांची सकाळपासून तारांबळ उडाली. प्रशासन तसेच पोलीस विभागाच्या वतीने तातडीने उपाययोजना करण्यात आल्याने शेषणगर येथील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी अद्यापही धोका टळलेला नाही.

ठळक मुद्देजनजीवन विस्कळीत : ब्रह्मपुरीत हाहाकार, एक जण वाहून गेला, शेकडो घरांत पाणी घुसले, शेतीचेही मोठे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शुक्रवारी सकाळपासून जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, नागभीड, चिमूर तालुक्यात पावसाने कहर केला असून ढगफुटीसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात पहाटे ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने ४ ते ५ तास हजेरी लावली. यामुळे संपूर्ण तालुका पाण्याखाली आला आहे. सुंदरनगर, हनुमाननगर, भवानी वार्ड, कुर्झा प्रभागात जवळपास १०० घरांचे तसेच ग्रामीण भागात १२५ घरांची पडझड झाल्याचे वृत्त आहे. तालुक्यातील बेटाळा येथील लक्ष्मीबाई सौंदरकर या महिलेच्या अंगावर भिंत पडून ती गंभीर जखमी झाली आहे. तर बोढेगाव येथील पुंडलिक रामाजी गाढे (६५) हे पाण्यात पाहून गेल्याची माहिती मिळाली असून प्रशासनाने शोधकार्य सुरु केले आहे. नागभीड नगर परिषदेतंर्गत येणाऱ्या बाम्हणीला पुराच्या पाण्याने पुन्हा वेढले असून ३५० घरांची लोकवस्ती असलेले संपूर्ण गावच बाधित झाले आहे. नागभीड - बाम्हणी नाला ओसंडून वाहू लागल्याने काही वेळासाठी नागपूर - नागभीड मार्ग बंद करण्यात आला होता. तर चिमूर तालुक्यातील खैरी व पांजरेपार गावाजवळील नाल्याला आलेल्या पुरामुळे अनेक घरांत पाणी शिरले असून रस्ते पूर्णत: जलमय झाले आहेत.अघोषित संचारबंदीब्रह्मपुरी शहरात सकाळपासून मुसळधार पावसाने कहर केल्यामुळे कुणीही घराबाहेर निघला नाही. परिणामी शहरात अघोषित संचारबंदीचे दृश्य आज बघायला मिळाले. शाळा, महाविद्यालय शिक्षक, विद्यार्थी जाऊ शकले नाही. सकाळी ९ नंतर काही प्रमाणात नागरिक रस्त्यावर दिसले.बारई तलाव फुटण्याच्या मार्गावरब्रम्हपुरीतील बारई तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाच्या पाळीवरून पाणी वाहत होते. सदर पाळीला मोठे भगदाड पडल्याने शहरवासीयांची सकाळपासून तारांबळ उडाली. प्रशासन तसेच पोलीस विभागाच्या वतीने तातडीने उपाययोजना करण्यात आल्याने शेषणगर येथील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी अद्यापही धोका टळलेला नाही. सदर तलाव खासगी मालकीचा असल्याने प्रशासनानेही दुर्लक्ष केले आहे. तलावाची मालकी असल्याचे सांगणारेही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेकडो घरांना याचा परिणाम भोगावा लागत आहे. शांतीनगरातील शतायू रुग्णालयात उपचारासाठी जाणाºया रुग्णांना ३ ते ४ फूट पाण्यातून मार्ग काढत जावे लागले. यामुळे रुग्णांसह नागरिकांचे प्रचंड हाल झाले.तालुक्यातील शेतकरी संकटातचिमूर तालुक्यात मागील चार दिवसांपासून पावसाच्या दुसºया इनींगमुळे तालुक्यात ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन पीक पाण्याखाली आल्याने हा हंगाम शेतकऱ्यांना नुकसान दायक ठरणार असून शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.सावधगिरीचा इशाराशहरातील बारई तलावाची धोकादायक स्थिती लक्षात घेता तलावाच्या खालील भागात राहणाºया शेषनगर परिसरातील नागरिकांना ध्वनिक्षेपकाच्या सहाय्याने प्रशासनाने नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला असून वेळप्रसंगी सदर भागातील नागरिकांना इतरत्र हलविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. गोसेखुर्द प्रकल्पाचे ११ दरवाजे दीड मीटरने व २२ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी अधिकाºयांची बैठक घेऊन मदत करण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर