शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

फुलोऱ्यावरील धानाला पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 06:00 IST

दुसरीकडे उच्चप्रतीचा धानही किडींच्या आक्रमणात सापडला आहे. विविध किडींचे आक्रमण झाले आहे. कीड नियंत्रणासाठी शेतकरी महागडे किटकनाशक फवारत आहे. परंतु फवारणी होत नाही तोच पावसाची सर कोसळते. त्यामुळे फवारणीचा कोणताही परिणाम किडींवर होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हमणे आहे.

ठळक मुद्देफवारणीचा उपयोग नाही : धानावर कीडीचे आक्रमण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: सततच्या पावसाचा फुलोऱ्यावर आलेल्या धानाला फटका बसत आहे. धानाचे फूल जळत असल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे उच्च प्रतीच्या धानावर कीडीचे आक्रमण झाले आहे. पावसामुळे फवारणीही निष्प्रभ ठरत असून शेतकरी हवालदिल झाले आहे.गत २५ दिवसांपासून जिल्ह्यात दररोज पाऊस कोसळत आहे. सध्या हलक्या प्रतीचा धान निसरला असून काही ठिकाणी तो फुलोऱ्यांवर आला आहे. सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने झालेला पाऊस पिकांसाठी समाधानकारक असला तरी आता मात्र सततच्या पावसाचा फटका हलक्याप्रतीच्या धानाला बसत आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात हलक्याप्रतीच्या धानाची लागवड करण्यात आली. सध्या फुलोºयावरील धानाला पावसाचा फटका बसत आहे. निसवून १५ ते २० दिवस झालेल्या धानाचे सर्वाधिक नुकसान होत आहे. फूल जळत असल्याने धान भरत नाही. त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे.दुसरीकडे उच्चप्रतीचा धानही किडींच्या आक्रमणात सापडला आहे. विविध किडींचे आक्रमण झाले आहे. कीड नियंत्रणासाठी शेतकरी महागडे किटकनाशक फवारत आहे. परंतु फवारणी होत नाही तोच पावसाची सर कोसळते. त्यामुळे फवारणीचा कोणताही परिणाम किडींवर होत नसल्याचे शेतकºयांचे म्हमणे आहे. सातत्याने महागडी फवारणी करावी लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.सुरुवातीला पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले होते. या परिस्थितीतही शेतकºयांनी सिंचन करुन धान जगविला. सप्टेंबर महिन्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली. शेतकºयांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. मात्र १५ दिवसांपासून पाऊस थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतकरी धास्तावलेला दिसत आहे.तीन वर्षांपासून नापिकीमागील तीन वर्षांपासून सततच्या नापिकीला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. यावर्षी नाही, तर पुढल्यावर्षी तरी चांगले पिक येईल, या आशेने शेतकरी राबराब राबून कष्ट करीत. मात्र लहरी निसर्गामुळे सर्व व्यर्थ गेल्यागत परिस्थिती बळीराजासमोर निर्माण झाली आहे. शासनाने खरीप पिकांच्या लागवडीसाठी बी-बियाणे पुरविण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात त्याचा लाभ शेतकºयांना मिळाला नाही. त्यामुळे याही वर्षी शेतकºयांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागणार आहे.कृषी विभागाने करावे मार्गदर्शनकाही भागात धान पिकावर किडीचे आक्रमण झाले आहे. शेतकरी आपल्या पद्धतीने महागडी औषधी फवारत आहे. मात्र त्याचा फारसा परिणाम होत नाही. कीड नियंत्रणासाठी कोणते औषध फवाराचे, याबाबत कृषी विभाग मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.पावसामुळे खरीप पिके धोक्यातसाधारणत: दीड ते दोन महिन्यांपासून संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे खरीप पिकांना फटका बसला आहे. पीक व्यवस्थापनावरील खर्चातवाढ झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती