राहुल कार्डिले जि.प.चे नवे सीईओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 22:56 IST2019-02-27T22:56:26+5:302019-02-27T22:56:39+5:30
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी जितेंद्र पापळकर यांची पदोन्नतीवर अकोला येथे जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आलीे. याबाबतचे आदेश २० फेब्रुवारीला निर्गमित करण्यात आले.

राहुल कार्डिले जि.प.चे नवे सीईओ
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी जितेंद्र पापळकर यांची पदोन्नतीवर अकोला येथे जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आलीे. याबाबतचे आदेश २० फेब्रुवारीला निर्गमित करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या जागेवर कोणाचीही नियुक्ती झाली नव्हती. दरम्यान, आता राहुल कार्डिले यांची चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी अमरावती जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. जितेंद्र पापळकर यांची अडीच वर्षांनंतर पदोन्नतीवर बदली करण्यात आली होती.