शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदारांचा उत्साह; सकाळपासूनच लांब रांगा
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
5
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
6
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
7
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
8
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
9
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
10
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
11
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
12
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
13
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
14
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
15
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी
16
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
17
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
18
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
19
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
20
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 

चंद्रपुरात युतीत उमेदवारीसाठी चढाओढ; आघाडीत सस्पेन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:54 AM

काँग्रेस आघाडीमध्येही अद्याप उमेदवारीचा सस्पेंस कायम आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने महेश मेंढे यांना मैदानात उतरविले होते. तिकीट दिली होती. यावेळीही मेंढे यांनी चांगलीच कंबर कसली आहे. २०१४ मध्ये मोदी लाट असताना लढलो मग यावेळी का नाही, असा त्यांच्या प्रयत्नातील सूर आहे. मेंढेंसोबतच पक्षातील अनेक मंडळी काँग्रेसच्या तिकीटावर डोळा ठेवून आहे.

ठळक मुद्देरणधुमाळी : उमेदवारांबाबत जनतेत उत्सुकता, जोरगेवारांचे काय?

राजेश भोजेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सर्वच राजकीय पक्षांच्या दिग्गज मंडळींचे वास्तव्य असलेला चंद्रपूर विधानसभा मतदार संघ नेहमी चर्चेत असतो. या मतदार संघातील सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार अद्याप पडद्याआड असल्याने नवे चेहरे मैदानात उतरतील वा जुनेच चेहरे आमने-सामने येतील, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा हा पहिला मतदार संघ. मुनगंटीवार यांनी केलेल्या विकास कामांच्या बळावर जनतेनी सलग तीनवेळा त्यांना निवडून दिले. इतकेच नव्हे, तर काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात गेल्या २५ वर्षांपासून मुनगंटीवार यांच्यामुळे कमळ फुलत आहे. २००९ मध्ये हा मतदार संघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाल्याने मुनगंटीवारांना बल्लारपूर मतदार संघाची निवड करावी लागली. भाजपने नाना श्यामकुळे यांना नागपुरातून चंद्रपुरात आणून उमेदवारी दिली. ते दहा वर्षांपासून या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. परंतु या काळात त्यांच्यामार्फत अपेक्षित विकासकामे न झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला जात आहे. हाच धागा पकडून आपल्याला तिकीट मिळावी, यासाठी जि.प. सभापती ब्रिजभुषण पाझारे आणि राजेश मून यांच्या हालचाली सुरू आहे. पाझारे हे गेल्या काही महिन्यांपासून मतदारापर्यंत पोहचत आहे. यामुळे भाजप पक्षश्रेष्ठीपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. या मतदार संघाची निवडणूक भाजपसाठी वाटते तितकी सोपी दिसत नसल्याचा सूर आहे. भाजप नाना श्यामकुळे यांच्यावरच तिसऱ्यांदा बाजी लावते, असे वरवर दिसत असले तरी अधिकृत घोषणेकडे जनतेचे लक्ष लागले आहे.काँग्रेस आघाडीमध्येही अद्याप उमेदवारीचा सस्पेंस कायम आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने महेश मेंढे यांना मैदानात उतरविले होते. तिकीट दिली होती. यावेळीही मेंढे यांनी चांगलीच कंबर कसली आहे. २०१४ मध्ये मोदी लाट असताना लढलो मग यावेळी का नाही, असा त्यांच्या प्रयत्नातील सूर आहे. मेंढेंसोबतच पक्षातील अनेक मंडळी काँग्रेसच्या तिकीटावर डोळा ठेवून आहे. यासोबतच गेल्या निवडणुकीत भाजपशी काडीमोड घेऊन शिवसेनेकडून लढलेले किशोर जोरगेवार यांनी आता काँग्रेसचा हात धरण्याच्या हालचाली वाढविल्या आहे. काँग्रेसश्रेष्ठी मतदार संघात रिस्क घेण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. या अनुषंगाने लोकसभेच्या धर्तीवर जोरगेवार यांच्या नावाचा विचार सुरू असल्याचे समजते. परंतु जोरगेवार यांनी शिवसेना सोडली खरी पण काँग्रेसमध्ये अद्याप प्रवेश न घेतल्यामुळे त्यांच्या उमेदवारीला पक्षातील काही मंडळींकडून विरोध होत असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार सुरेश धानोरकर हेही शिवसेनेतूनच आलेले आहे. शिवसेनेत असताना या दोघांमध्ये फारसे सख्य नसल्याचे सर्वश्रूत आहे.या संबंधावरही जोरगेवारांची काँग्रेस तिकीट बरीच अवलंबून आहे. लोकसभेत भाजपला अडचणीत आणणाºया वंचित बहुजन आघाडीकडून एकही चेहरा पुढे आला नसला तरी युती व आघाडीतील राजकीय घडामोडींमुळे निवडणूक चुरशीही होईल असे चित्र आहे.मतदार संघातील आमदार१९६२ - रामचंद्र पोटदुखे (अपक्ष)१९६७ व १९७२- एकनाथ साळवे (काँग्रेस )१९७८ व १९८० - नरेश पुगलिया (काँग्रेस)१९८५ व १९९० - श्याम वानखेडे (काँग्रेस)१९९५, १९९९ व २००४ - सुधीर मुनगंटीवार(भाजप)२००९ व २०१४- नाना श्यामकुळे (भाजप)

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019