वरोरा तालुक्यात प्रथमच ४६६ हेक्टरवर रब्बी व उन्हाळी सोयाबीनची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:27 IST2021-03-06T04:27:06+5:302021-03-06T04:27:06+5:30

पुढील हंगामाकरिता सोयाबीन बियाणे तयार वरोरा : मागील काही वर्षापासून सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांना दगा दिला. यावर्षी सोयाबीनचे उत्पन्न अत्यल्प ...

Rabi and summer soybean cultivation on 466 hectares for the first time in Warora taluka | वरोरा तालुक्यात प्रथमच ४६६ हेक्टरवर रब्बी व उन्हाळी सोयाबीनची लागवड

वरोरा तालुक्यात प्रथमच ४६६ हेक्टरवर रब्बी व उन्हाळी सोयाबीनची लागवड

पुढील हंगामाकरिता सोयाबीन बियाणे तयार

वरोरा : मागील काही वर्षापासून सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांना दगा दिला. यावर्षी सोयाबीनचे उत्पन्न अत्यल्प प्रमाणात झाले. त्यातही दर्जा नव्हता. त्यामुळे पुढील हंगामात सोयाबीन बियाणाचा तुटवडा तसेच सोयाबीन बियाणे महाग होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी व उन्हाळी सोयाबीनची लागवड करून पुढील वर्षीचे सोयाबीन बियाणे तयार करून ठेवले.

खरीप हंगामात वातावरणातील बदल व कीड रोगाने सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले होते. काही शेतकऱ्यांकडे उत्पादन चांगले झाले. परंतु त्यांनी विकले नाही, त्या बियाण्याचे जतन करून पुढील वर्षी हे बियाणे शेतात लावले जाईल. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात बाजारात सोयाबीन आले नाही. म्हणून पुढील वर्षी सोयाबीन बियाणे तुटवडा जाणवणार हे लक्षात घेता कृषी विभागाच्या मार्गदर्शनात खरीप हंगाम व्यतिरिक्त रब्बी उन्हाळी सोयाबीन, ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात आला.

वरोरा तालुक्यात शेतकऱ्यांनी त्याला चांगला प्रतिसाद देत ४६६ हेक्टरमध्ये रब्बी व उन्हाळी हंगामात सोयाबीनची प्रथमच लागवड केल्याचे मानले जात आहे. त्यामध्ये तीन ते चार हजार क्विंटल बियाणे निघणार आहे. पुढील वर्षीच्या हंगामात सोयाबीन बियाणे लागवडीच्या कामी येईल.

Web Title: Rabi and summer soybean cultivation on 466 hectares for the first time in Warora taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.