शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
3
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
4
"मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
5
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
6
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
7
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
8
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
9
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
10
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
11
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
12
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
13
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
14
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
15
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
16
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
17
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
18
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
19
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
20
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद

शेतमालाच्या हमीभावाचा प्रश्न अंधातरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 11:48 PM

शासनाने शेतकऱ्यांच्या भावनांचे केवळ राजकारण केले. शेतकऱ्यांच्या आवश्यक बाबींकडे कमालीचे दुर्लक्ष केल्याने कधी, नव्हे एवढा शेतकरी त्रस्त झाला. पीक कर्ज मिळालेच नाही, विम्याच्या रक्कमेनेही हुलकावणी दिली. शेतरस्त्यांची कामेच थांबली, अनेक योजनांचा बोजवारा उडाला, असे मत जिल्ह्यातील शेतकºयांचे आहे.

ठळक मुद्देनिवडणूक आल्या आणि गेल्या : शेतकऱ्यांवर केवळ आश्वासनाचा पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाने शेतकऱ्यांच्या भावनांचे केवळ राजकारण केले. शेतकऱ्यांच्या आवश्यक बाबींकडे कमालीचे दुर्लक्ष केल्याने कधी, नव्हे एवढा शेतकरी त्रस्त झाला. पीक कर्ज मिळालेच नाही, विम्याच्या रक्कमेनेही हुलकावणी दिली. शेतरस्त्यांची कामेच थांबली, अनेक योजनांचा बोजवारा उडाला, असे मत जिल्ह्यातील शेतकºयांचे आहे.मागील काही वर्षांत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी न होता वाढले. आॅनलाईन पीक कर्ज, पीक विम्याची रक्कम मिळण्यातही कमालीचा त्रास झाल्याचा अनुभव शेतकºयांना आला. उत्पादन खर्चावर आधारित ५० टक्के नफ्याने हमीभाव देण्याच्या मुद्यांवर तर शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेती उत्पादनाला भाव मिळत नसल्याने कर्ज वाढत असल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.कर्जमाफी केवळ आश्वासन1 शासन तसेच विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केवळ राजकारण केले आहे. या भरोवश्यावर ते सत्तेत येतात. मात्र त्यानंतर ते विसरतात. शेतकºयांचे प्रश्न कधीच सुटू नये, अशी भावना आजच्या राजकारण्यांची असल्याची भावना आता शेतकरी व्यक्त करीत आहे.2कर्जमाफी देताना ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकित होते. त्यांना त्याचा लाभ झाला. मात्र ज्यांनी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड केली त्यांचे काय, त्यांना केवळ २० ते २५ हजार रुपये देऊन केवळ बोळवण केली. हा दुजाभाव करून राज्यसरकारने शेतकऱ्यांमध्ये भांडण लावून देण्याचे काम सुरू केल्याचे मतही काही शेतकऱ्यांचे आहे..3सरसकट कर्जमाफी,शेतउत्पादनाला योग्य भाव, रासायनिक खते, बियाणे अनुदानावर दिल्यास शेतकºयांना दिलासा मिळू शकतो.जाचक अटी लादू नयेशेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमी भाव द्यावा, दुष्काळी अनुदान द्यावे, कर्जमाफीतील जाचक अटी रद्द कराव्या, शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये कर्ज द्यावे, शेती उपयोगी साहित्य सवलतीच्या दरात द्यावे, संपूर्ण सात-बारा कोरा करावा, या मागण्यांवर विचार करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावा, अशी शासनाला वाटत असेल तर शासनाने प्रथम शेतीमालाला आधारभूत किंमत देणे आवश्यक आहे. त्याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.शेतकरी संकटात का?पारंपारिक शेती करण्याची पद्धत. सिंचनाचा अभाव, योग्य मार्गदर्शन नाही. रासायनिक खते, बियानांच्या वाढत्या किंमती, योग्य बाजारभाव न मिळते, पिककर्ज देताना अनेक अडचणी.रोहयोसाठी निधीची अडचण1रोजगार हमी योजनेच्या कामांसाठी निधी मिळण्यास ब्रेक लावण्यात आला होता. याबाबत ओरड झाल्याने केंद्र शासनाने १४ डिसेंबर २०१८ रोजी संपूर्ण राज्यभरासाठी २५० कोटी रुपये निधी दिली. त्यातही खर्च करण्याला अनेक निकष असल्याने शेत रस्त्यांची कामे सुरुच झाली नाहीत.2महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेच्या कामांसाठी राज्यात गेल्या आॅक्टोबर २०१७ पासून निधी मिळण्याचा मार्गच रोखल्याने या काळात राज्यभरात सुरु असलेली तब्बल १४,७४० कामे थांबविण्यात आली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकchandrapur-pcचंद्रपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019