५७२ शाळांसाठी १ कोटी ३१ लाख रुपयांच्या पुस्तकांची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:24 IST2021-03-07T04:24:22+5:302021-03-07T04:24:22+5:30

यूपीएसची, एमपीएसची परीक्षेत जिल्ह्याचा टक्का अत्यंत कमी आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षणापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती व्हावी, यासाठी जिल्हा ...

Purchase of books worth Rs. 1 crore 31 lakhs for 572 schools | ५७२ शाळांसाठी १ कोटी ३१ लाख रुपयांच्या पुस्तकांची खरेदी

५७२ शाळांसाठी १ कोटी ३१ लाख रुपयांच्या पुस्तकांची खरेदी

यूपीएसची, एमपीएसची परीक्षेत जिल्ह्याचा टक्का अत्यंत कमी आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षणापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती व्हावी, यासाठी

जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करून त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार केले जाणार आहे.

मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी शिक्षण विभागाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून १ कोटी ३१ लाख रुपये खर्चून २१४ विविध पुस्तकांचा एक संच अशा पद्धतीने तब्बल ५७१ शाळांना हा संच पुरविण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ज्या शाळांत संच पोहोचले आहे. त्या शाळांतील मुख्याध्यापकांना अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तक पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असून, तसा अहवाल शिक्षण समितीला द्यावा लागणार आहे.

बाॅक्स

या पुस्तकांचा संच

शाळांना पुरविण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये एकूण २१४ पुस्तकांचा संच आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, वाचनाची आवड निर्माण करणारे पुस्तक, नवीन घडामोडीची माहिती, स्पर्धा परीक्षेची तयारी, शिष्यवृत्ती, सैनिक प्रवेश परीक्षा, नवोदय प्रवेश परीक्षा, आत्मचरित्र, भुगोल, भारताचा इतिहास, वायोग्राफीसह विविध गाजलेल्या पुस्तकांचा यात समावेश आहे.

बाॅक्स

खर्च

१,३१००००

शाळा

५७२

एका संचात पुस्तक

२१४

कोट

विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, शालेय जीवनातून

स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी, विविध बाल साहित्य वाचण्यासाठी मिळावे यासाठी पुस्तकांची खरेदी करण्यात आली आहे. याचा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार असून, स्पर्धा परीक्षेची टक्केवारी वाढेल.

- राहुल कर्डिले

मुख्यकार्यकारी अधिकारी, चंद्रपूर

Web Title: Purchase of books worth Rs. 1 crore 31 lakhs for 572 schools