धान पट्ट्यात २ लाख ३ हजार क्विंटल धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:01 IST2020-04-25T05:00:00+5:302020-04-25T05:01:24+5:30

चिमूर आदिवासी प्रकल्पात नागभीड, चिमूर, सिंदेवाही, भद्रावती व वरोरा या तालुक्यांचा समावेश असला तरी या तालुक्यांपैकी नागभीड, सिंदेवाही व चिमूर या तालुक्यातच धानाचे उत्पादन मोठया प्रमाणावर घेतल्या जाते. नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हातात येते. यानंतर शेतकरी आपले धान विक्रीसाठी काढत असतात.

Purchase of 2 lakh 3 thousand quintals of paddy in paddy belt | धान पट्ट्यात २ लाख ३ हजार क्विंटल धान खरेदी

धान पट्ट्यात २ लाख ३ हजार क्विंटल धान खरेदी

ठळक मुद्दे२५३५ असा भाव : लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा

घनश्याम नवघडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : कृउबास आणि खुल्या बाजारापेक्षा आदिवासी विकास महामंडळ व पणन महासंघाकडून धानास जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल आदिवासी विकास महामंडळाकडे यावर्षी मोठया प्रमाणावर वाढला. आदिवासी विकास महामंडळाच्या चिमूर प्रकल्पात २६ आदिवासी सोसाट्यांमार्फत धान खरेदी करण्यात आली. ३१ मार्चच्या आकडेवारीनुसार या २६ सोसायटयांनी धान उत्पादक तालुक्यातील तब्बल २ लाख ३ हजार क्विंटल धानाची खरेदी केली आहे.
चिमूर आदिवासी प्रकल्पात नागभीड, चिमूर, सिंदेवाही, भद्रावती व वरोरा या तालुक्यांचा समावेश असला तरी या तालुक्यांपैकी नागभीड, सिंदेवाही व चिमूर या तालुक्यातच धानाचे उत्पादन मोठया प्रमाणावर घेतल्या जाते. नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हातात येते. यानंतर शेतकरी आपले धान विक्रीसाठी काढत असतात.
शासनाने यावर्षी आदिवासी सोसायटयांना व पणन महासंघाने संस्था संचालित करीत असलेल्या भात गिरण्यांना धान खरेदीचे अधिकार दिले होते. या सोसायटयांचे हमीभाव १८३५ अधिक ५०० बोनस व सानुग्रह २०० रुपये असल्याने शेतकरी आपले धान सोसायटीमध्येच विक्री करण्याचा प्रयत्न केला. उलटपक्षी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धानाचे भाव १ हजार ९०० ते २ हजार १०० रूपयांच्या पलिकडे गेले नाही. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांनी आदिवासी महामंडळाच्या केंद्रावरच धान विक्री केली.
दरामधील ही तफावत लक्षात घेता बहुतांशी शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी आपला मोर्चा आदिवासी सोसायटया व पणन महासंघाच्या केंद्राकडे वळविला. परिणामी धान खरेदीचे अधिकार असलेल्या सोसायटयांसमोर शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेले धान कुठे ठेवावे, हा प्रश्न काही काळ निर्माण झाला होता.

३० एप्रिलपर्यंत धान खरेदी
आदिवासी विकास महामंडळाकडून ही धान खरेदी ३१ मार्चपर्यंतच करण्यात येणार होती. मात्र सध्या कोरोनामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्याने ही धान खरेदीची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती चिमूर आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापक जी. आर. राठोड यांनी 'लोकमत'ला दिली.

पणन महासंघाकडूनही खरेदी
नागभीड तालुक्यात आदिवासी विकास महामंडळाकडून धान खरेदी तर करण्यात आलीच, पण त्याचबरोबर पणनमहासंघाकडूनही मोठया प्रमाणावर धान खरेदी करण्यात आली. पणन महासंघाचे नागभीड व कोर्धा येथे धान खरेदी केंद्र होते. ही दोन्ही केंद्र धान उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. या केंद्रांवर मोठया प्रमाणावर धान खरेदी करण्यात आली. पण तपशिल प्राप्त होऊ शकला नाही.

Web Title: Purchase of 2 lakh 3 thousand quintals of paddy in paddy belt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.