जिल्ह्यात जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:25 IST2021-04-19T04:25:45+5:302021-04-19T04:25:45+5:30
चंद्रपूर : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केली जात आहे. ...

जिल्ह्यात जनता कर्फ्यू
चंद्रपूर : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केली जात आहे. तरीही रुग्णसंख्येत घट होत नसल्यामुळे आता २१ ते २५ एप्रिल आणि २८ ते १ मे दरम्यान जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात सर्व पानठेले, चहा टपरी, हातगाडी, फुटपाथवरील चायनीजसह इतर सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना बंद राहणार आहे. नागरिकांनी, लोकप्रतिनिधींनी स्वयंघोषित कर्फ्यू पाळून सुरक्षिततेसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
बाॅक्स
या काळात जनता कर्फ्यू
दि.२१ ते २५ एप्रिल आणि २८ ते १ मे पर्यंत जनता कर्फ्यू राहणार आहे.
बाॅक्स
काय राहणार सुरू
सर्व दवाखाने व औषधी दुकाने, कृषी केंद्र व पशुखाद्य दुकाने, सर्व शासकीय कार्यालय, बँक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत औद्योगिक आस्थापना (कार्यालयीन दिवशी), घरपोच सेवासह दूध वितरण, वर्तमानपत्र, एल.पी.जी. गॅस वितरण, पेट्रोल पंप व हाॅटेलमधून घरपोच सेवा सुरू राहील. परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी व त्यांच्यासोबत पालकांना परवानगी राहील. यासाठी प्रवेशपत्र सोबत बाळगणे आवश्यक.
बाॅक्स
काय राहणार बंद
किराणा दुकान, भाजीपाला, फळे सर्व प्रकारच्या व्यापारी आस्थापना, दुकाने बंद राहील.