शेतकऱ्यांना सुरक्षा किट पुरवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:20 IST2021-07-18T04:20:56+5:302021-07-18T04:20:56+5:30
चंद्रपूर : शेतकरी खरीप हंगामातील शेतीच्या कामात व्यस्त आहेत. दरम्यान साप, विंचू अशा सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे धोका होण्याची शक्यता आहे. ...

शेतकऱ्यांना सुरक्षा किट पुरवावी
चंद्रपूर : शेतकरी खरीप हंगामातील शेतीच्या कामात व्यस्त आहेत. दरम्यान साप, विंचू अशा सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा बचाव करण्यासाठी सुरक्षा किट पुरविण्यात यावी, अशी मागणी होत आहे. पूर्वी शेतकऱ्यांना अशा किट पुरविण्यात येत होत्या. त्यामुळे गुडघ्यापर्यंत बूट, हँडग्लोज आदी साहित्यांचा पुरवठा करावा, अशी मागणी आहे.
योजना पुस्तिकेचे वितरण करावे
चंद्रपूर : शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. मात्र, त्याची पुरेशी जनजागृती नसल्याने अनेक जण योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे अशा योजनांची एखादी माहिती पुस्तिका तयार करून तिचे मोफत वितरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई
चंद्रपूर : जिल्ह्यात दारूविक्री सुरू झाली आहे. त्यामुळे मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अपघात होण्याच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.