तुळशीनगरातील मंदिराला सुविधा उपलब्ध करून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:50 IST2021-03-13T04:50:56+5:302021-03-13T04:50:56+5:30

नागमंदिर सेवा समितीची मागणी : आमदार जोरगेवार यांना निवेदन चंद्रपूर : येथील तुळशीनगरामध्ये असलेल्या नागमंदिर परिसरात शौचालय तसेच इतर ...

Provide facilities to the temple in Tulsinagar | तुळशीनगरातील मंदिराला सुविधा उपलब्ध करून द्या

तुळशीनगरातील मंदिराला सुविधा उपलब्ध करून द्या

नागमंदिर सेवा समितीची मागणी : आमदार जोरगेवार यांना निवेदन

चंद्रपूर : येथील तुळशीनगरामध्ये असलेल्या नागमंदिर परिसरात शौचालय तसेच इतर सुविधा उपलब्ध करून भाविकांना दिलासा देण्याची मागणी येथील नागमंदिर सेवा समितीने केली आहे. यासंदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे.

तुळशीनगरामध्ये पुरातन नागमंदिर आहे. या मंदिराची लोकवर्गणीतून उभारणी करण्यात आली आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. मात्र येथे असुविधा असल्याने भक्तांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, लाॅकडाऊनच्या काळामध्ये परिसरातील नागरिकांनी एकत्र येत मंदिराकडे जाण्यासाठी लोकसहभागातून लोखंडी पुलाची निर्मिती करीत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. यामळे मंदिरात जाण्यासाठी सुविधा झाली आहे. मात्र, शौचालय तसेच प्रसाधनगृह नसल्यामुळे भाविकांना इतरत्र जावे लागते. त्यामुळे मंदिर परिसरात शौचालय तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे करण्यात आली. दरम्यान, आमदार जोरगेवार यांनी येत्या काही दिवसातच मंदिर परिसरात सुसज्ज शौचालय उभारून देण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे. शिष्टमंडळात रामराव नागपुरे, नत्थुजी चौधरी, वामन गोंधळी, हरिदास जुनगरी, मधुकर येवले कैलास धुमाळे यांच्यासह अन्य सदस्यांचा सहभाग होता.

Web Title: Provide facilities to the temple in Tulsinagar