ब्रह्मपुरीत बँकाच्या खासगीकरणाविरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:28 IST2021-03-17T04:28:28+5:302021-03-17T04:28:28+5:30

ब्रह्मपुरी : राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण करण्याच्या विरोधात सोमवार व मंगळवारी बँका बंद ठेवून सात बँकांनी एकत्र येऊन निदर्शने केली. ...

Protests against privatization of banks in Brahmapuri | ब्रह्मपुरीत बँकाच्या खासगीकरणाविरोधात निदर्शने

ब्रह्मपुरीत बँकाच्या खासगीकरणाविरोधात निदर्शने

ब्रह्मपुरी : राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण करण्याच्या विरोधात सोमवार व मंगळवारी बँका बंद ठेवून सात बँकांनी एकत्र येऊन निदर्शने केली.

सरकारी बँकांच्या खाजगीकरणाला विरोध, सामाजिक बँकिंग पूर्ववत सुरू ठेवणे, जनतेच्या पैशाची सुरक्षा करणे, बँकिंग क्षेत्रात नवीन रोजगार निर्माण करणे, ग्रामीण शाखा सुरू ठेवणे या व अन्य मागण्यांसाठी निदर्शने करून बँका बंद ठेवण्यात आल्या आहेत. या संपात बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आदी बँकांनी सहभाग घेतला. या वेळी वेदानंद सहारे, आशिष धोंगडे, दुर्वेश तजुले, मानस बिसोई, सचिन डोंगरे, दिलीप कोडापे, प्रशांत खाडीलकर, राहुल चेटूले, प्रमोद जनबंधु, शुभांगी बेंदेवार आदींनी मार्गदर्शन केले.

Web Title: Protests against privatization of banks in Brahmapuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.