Protesters protest against oppression | दडपशाहीविरोधात आंदोलनकर्त्यांची निदर्शने

दडपशाहीविरोधात आंदोलनकर्त्यांची निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भाजपा सरकारच्या दडपशाही वृत्तीच्या विरोधात आज विविध संघटनांनी चंद्रपूर बंद पुकारला होता. वरकरणी असे दाखविले जात असले तरी एका विशिष्ट व्यक्तीला पाठिंबा देण्यासाठी हा बंद असल्याने याला चंद्रपुरातील व्यापाऱ्यांनी विशेष प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मुख्य मार्गासह अनेक भागातील व्यापारी प्रतिष्ठाने आज सुरूच होती.
यावेळी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, आम आदमी पार्टी, बी.आर.एस पी, संभाजी ब्रिगेड, वंचित बुहुजन आघाडी, मनसे, बानाई चंद्रपूर, धनोजे कुणबी समाज संघटना, अखील भारतीय कुणबी संघटना, जनसुराज्य सेना, वैदर्भ तैली संघटन, विदर्भ राज्य आंदोलन समिती, तेलगु समाज संघटन, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षकत्तेर कर्मचारी संघटना, सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट, ओबीसी फेडरेशन, तिरंगा वाहनी आदी संघटनातील पदाधिकाऱ्यांनी हा बंद पुकारला होता. या पदाधिकाºयांनी आज सकाळी शहरात फिरून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. काही व्यापाºयांनी दुकाने बंद ठेवली. काहींनी काही वेळासाठी दुकान बंद करून आणखी उघडले. शहरातील अनेक भागातील दुकाने सुरूच होती. विशेष म्हणजे, पेट्रोल पंपदेखील सुरू होते. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

आंदोलन कशासाठी? : उलटसुलट चर्चा
एका खासगी संघटनेचा पदाधिकारी असलेल्या व्यक्तीला पाठिंबा देण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला. मात्र सदर व्यक्ती प्रत्येकवेळी अशाच प्रकारचे वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करीत असतो. देवदेवता, महिलावर्ग यांच्याबाबतही या व्यक्तीने पोस्ट टाकल्या आहे. आणि त्या आक्षेपार्ह असल्याच्या प्रतिक्रियाही यापूर्वी उमटल्या आहे. अशा व्यक्तीसाठी बंद पुकारणे म्हणजे मूर्खपणा असल्याच्या प्रतिक्रिया आज जनमाणसात उमटत होत्या. या प्रकाराला राजकीय वळण देण्याचाही प्रयत्न झाला. मात्र तरीही व्यापाºयांनी व सर्वसामान्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही.

Web Title: Protesters protest against oppression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.