राज ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाचा चंद्रपुरात निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2022 05:00 IST2022-05-07T05:00:00+5:302022-05-07T05:00:12+5:30
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये, राज ठाकरे यांनी सभेमध्ये खऱ्या इतिहासावर पांघरूण घातले आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडवरील समाधीचा शोध म. जोतिबा फुलेंनी नाही, तर लोकमान्य टिळकांनी लावला, असे विधान केले आहे. ते खोटे असल्याचे म्हटले आहे. सन १८६९ मध्ये रायगडावरील झाडेझुडपे तोडून व रस्ता करून म. जोतिबा फुले यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीवर फुले अर्पण केली. महात्मा फुले यांनी रयतेचा जाणता राजा शिवाजी महाराजांना अभिवादन केले. हे ऐतिहासिक सत्य आहे.

राज ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाचा चंद्रपुरात निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील क्षेत्रीय माळी समाज सेवा मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, या निवेदनामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे केलेले विधान खोटे असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर त्या विधानाचा निषेधही नोंदविला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये, राज ठाकरे यांनी सभेमध्ये खऱ्या इतिहासावर पांघरूण घातले आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडवरील समाधीचा शोध म. जोतिबा फुलेंनी नाही, तर लोकमान्य टिळकांनी लावला, असे विधान केले आहे. ते खोटे असल्याचे म्हटले आहे. सन १८६९ मध्ये रायगडावरील झाडेझुडपे तोडून व रस्ता करून म. जोतिबा फुले यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीवर फुले अर्पण केली. महात्मा फुले यांनी रयतेचा जाणता राजा शिवाजी महाराजांना अभिवादन केले. हे ऐतिहासिक सत्य आहे. पुढे १९ फेब्रुवारी १८७० पासून शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव प्रथम म. फुले यांनी सुरू केल्याचे, तसेच या घटनेच्या वेळी लोकमान्य टिळक हे अवघ्या १३ वर्षांचे होते, असेही निवेदनात नमूद केले आहे. राज ठाकरे यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्याविषयी खोटे विधान करून त्यांची अस्मिता डागाळण्याचा प्रयत्न केला आहे. या वक्तव्याने अखिल बहुजन समाज दु:खी झाल्याने त्यांच्या खोट्या अज्ञानमूलक विधानाचा आम्ही जाहीर निषेध करीत असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात क्षेत्रीय माळी समाज सेवा मंडळाने म्हटले आहे.