पेट्रोल दरवाढीचा व खराब रस्त्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:19 IST2021-01-01T04:19:57+5:302021-01-01T04:19:57+5:30
चंद्रपूर : दिवसेंदिवस पेट्रोल दरवाढीचा तसेच अमृत योजनेमुळे शहरातील रस्त्याच्या दुरवस्थेचा ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे शहरातील शिवाजी चौकात निषेध करण्यात ...

पेट्रोल दरवाढीचा व खराब रस्त्याचा निषेध
चंद्रपूर : दिवसेंदिवस पेट्रोल दरवाढीचा तसेच अमृत योजनेमुळे शहरातील रस्त्याच्या दुरवस्थेचा ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे शहरातील शिवाजी चौकात निषेध करण्यात आला.
अमृत योजनेमुळे चंद्रपूर शहरातील प्रत्येक वाॅर्डामध्ये रस्ते खोदून असल्यामुळे बंगाली कॅम्प-सावरकर चौक, ट्रॅफिक ऑफीस ते बाबूपेठ, लालपेठ, एमईएल नाका या परिसरातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्याची दुरुस्ती करावी. दिवसेंदिवस होणाऱ्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीचा ऑटोचालकांना मोठा फटका बसत आहे. या दरवाढीचाही निषेध करण्यात आला. याबाबतचे निवेदन महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खांडेकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना सादर केले आहे. यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर राऊत, जिल्हा सचिव सुनील धंदरे, जिल्हा संघटन प्रमुख विनोद चन्ने, बल्लारपूर तालुका अध्यक्ष अब्बास भाई, रमेश वझे, रमेश मून, मंगेश चवरे, राजू मोहुर्ले, अनिल मिसाळ, जनर्दन गुंजेकर, रवी आंबटकर, खुशाल साखरकर, सतीश गोरघाटे, राजू अलगुनवार, किरण मस्कावार, प्रशांत मेश्राम, नंदू नरखेडे आदी उपस्थित होते.