शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
4
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
5
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
6
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
7
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
8
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
9
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
10
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
12
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
13
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
14
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
15
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
16
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
17
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
18
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
19
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
20
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र

लाडकी बहीण योजनेच्या संभाव्य अटी - शर्ती वाढण्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 14:11 IST

सुरू झाली कुजबुज : सहाव्या हप्त्यापासून काही बहिणींची नावे वगळणार?

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळविण्यात अन्य घटकांसोबतच मोठा वाटा असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचाही मोठा वाटा आहे. मात्र, या योजनेच्या अटी व शर्तीमध्ये धक्कादायक बदल करण्याच्या चर्चा झडत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनी धसका घेतल्याची कुजबुज जिल्हाभरात सुरू झाली आहे. यासंदर्भात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लॉन्च केली. परिणामी, चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांतही ही बहुचर्चित योजना गेमचेंजर ठरणार, असा दावा सत्ताधारी पक्षाचे समर्थक करीत होते. ही योजना अमलात आणण्यासाठी सरकारच्या निर्देशानुसार, प्रशासनानेही मोठी तत्परता दाखविली. जिल्ह्यात ४ लाख ८५ हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. विधानसभा निवडणुकीत ही योजना महत्त्वपूर्ण ठरली. आता या लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे.

जानेवारी, जुलै की भाऊबीज ?आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीप्रसंगी त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत भूमिका मांडल्याने महिलांमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्यात आमदार मुनगंटीवार म्हणाले, 'आम्ही १०० टक्के ते आश्वासन पूर्ण करू, महिलांना दिली जाणारी रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये अशी वाढवली नाही तर आमची प्रतिमा खराब होईल. महायुतीचा जाहीरनामा समितीचा अध्यक्ष या नात्याने जाहीरनाम्यातून दिलेली आश्वासने धुळीस मिळू देणार नाही. सरकारमध्ये प्रत्येक पात्र महिलेला २१०० रुपये देण्याची क्षमता आहे. जानेवारी की जुलै, कोणत्या महिन्यापासून ही वाढीव रक्कम द्यायची यावर चर्चा केली जाईल. गतवर्षी भाऊबीजेच्या दिवशी योजना लागू झाली. त्यामुळे पुढील वर्षी भाऊबीजेपासून ही रक्कम वाढवू शकतो, असेही त्यांनी सांगितले आहे.

पाच हप्ते मिळाले, पुढचे काय? मतदानापूर्वी लाडकी बहीण योजनेचे पाच हप्ते ७ हजार ५०० रुपये खात्यात जमा झाले. जुलै व। ऑगस्ट महिन्यांचा पहिला अन् दुसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील हप्ताही काही दिवसांच्या फरकाने महिलांच्या खात्यात जमा झाला. दरम्यान, आचारसंहिता लागू होण्याअगोदरच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे एकत्रित पैसे दिवाळीतच खात्यात जमा केले आहेत. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यास या योजनेचे पैसे दीड हजार रुपयां- वरून २ हजार १०० रुपये करणार असल्याचे आश्वासन दिले होते. महायुतीचा दणदणीत विजय झाला.

या अटींची सुरू झाली चर्चा लाभार्थी महिलेचा पती आयकर भरतो का? कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का?, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का? विधवा, परित्यक्ता, निराधार व अन्य योजनांचा लाभ घेतला जातो आहे का? असे निकष तपासून लाडक्या बहिणींची यादी तयार होऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली.  प्रकारचे निकष लावले, तर जिल्ह्यात लाभार्थी महिलांची संख्या कमी होऊ शकतो.

विधानसभानिहाय महिला चंद्रपूर - ९३६१० वरोरा - ६७७२५ब्रह्मपुरी - ९४०३२राजुरा - ९१८९८चिमूर - ७२०३३बल्लारपूर - ६६६९९ 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाchandrapur-acचंद्रपूर