पोलिसांच्या वसाहतीचा प्रस्ताव रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 05:01 IST2020-07-30T05:00:00+5:302020-07-30T05:01:00+5:30
नागरिकांच्या संरक्षणासाठी दिवसरात्र झटणाऱ्या येथील पोलीस कर्मचाऱ्यांचे निवासस्थानाअभावी हाल होत आहेत. बºयाच कर्मचाºयांना पैसे खर्च करून भाड्याच्या घरात दिवस काढावे लागत आहे. घरमालक घर किरायाने देण्यास नकार देत असल्याचेही समजते. इंग्रजांच्या काळापासून नागभीड येथे पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. हे पोलीस ठाणे अडीच एकर जागेमध्ये वसले आहे.

पोलिसांच्या वसाहतीचा प्रस्ताव रखडला
घनश्याम नवघडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : येथे नवीन पोलीस ठाणे व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी वसाहतीच्या प्रस्तावाला शासनाने दोन वर्षांपूर्वी मंजुरी दिली होती. मात्र, हा प्रस्ताव रखडल्याने पोलिसांना भाड्याच्या घरात दिवस काढावे लागत आहेत.
नागरिकांच्या संरक्षणासाठी दिवसरात्र झटणाऱ्या येथील पोलीस कर्मचाऱ्यांचे निवासस्थानाअभावी हाल होत आहेत. बºयाच कर्मचाऱ्यांना पैसे खर्च करून भाड्याच्या घरात दिवस काढावे लागत आहे. घरमालक घर किरायाने देण्यास नकार देत असल्याचेही समजते. इंग्रजांच्या काळापासून नागभीड येथे पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. हे पोलीस ठाणे अडीच एकर जागेमध्ये वसले आहे. परंतु पोलिसांसाठी शासकीय निवासस्थाने नसल्याने येथील पोलीस कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
नागभीड-ब्रह्मपुरी या राष्ट्रीय मार्गावरील हे पोलीस ठाणे अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. पोलिसांना निवासस्थानाअभावी ताण सहन करावा लागत आहे. पोलीस हा जनतेचा मित्र असतो. दिवसरात्र कर्तव्यावर राहावे लागते. त्यांना हक्काचे घर मिळणे गरजेचे आहे. परंतु येथे मात्र निवासाची व्यवस्था नसल्याने कुटुंबांना भाड्याच्या घरात राहून जबाबदारी पार पाडावी लागत आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा करण्याची गरज आहे.
पोलीस ठाण्यासाठी अडीच एकर जागा उपलब्ध
नागभीड येथील पोलीस ठाण्याला अडीच एकर जागा उपलब्ध आहे. ब्रिटीशांनी पोलीस ठाण्याची इमारत, १ पोलीस निरीक्षक व ६ पोलीस कर्मचाºयांसाठी निवासस्थाने बांधली होती. पण ही निवासस्थाने जीर्ण झाली आहेत. सध्या १ पोलीस निरीक्षक, २ सहाय्यक पोलीस निरीक्षक, २ उपनिरीक्षक व ४८ पोलीस कार्यरत आहेत.