मालमत्ता कर आंदोलन तीव्र करणार

By Admin | Updated: March 9, 2016 02:02 IST2016-03-09T02:02:12+5:302016-03-09T02:02:12+5:30

महानगरपालिकेने मालमत्ता कर वाढविल्याच्या विरोधात राष्ट्रीय कॉंग्रेस लोकशाही आघाडीने सोमवारपासून आंदोलन सुरू केले आहे.

The property tax aggravation will be severe | मालमत्ता कर आंदोलन तीव्र करणार

मालमत्ता कर आंदोलन तीव्र करणार

महिला सरसावल्या : आंदोलनाचा दुसरा दिवस
चंद्रपूर: महानगरपालिकेने मालमत्ता कर वाढविल्याच्या विरोधात राष्ट्रीय कॉंग्रेस लोकशाही आघाडीने सोमवारपासून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनीही पुढाकार घेतला आहे. मालमत्ता करवाढ कमी न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी नगरसेवक लक्ष्मी पारनंदी, शकीना अन्सारी, शमीम मोहम्मद ईसराईल व आशिया परवीन मो.हारून या महिलांनी साखळी उपोषण केले.
सोमवारी महानगरपालिका गटनेता प्रशांत दानव, प्रवीण पडवेकर, सुरेश बोढणे, राजेश यादव यांचे उपोषण मंगळवारी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी सोडविले. त्यानंतर महिलांनी या आंदोलनात उडी घेऊन करवाढीच्या विरोधात आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.
मनपा व्यवस्थापन उपोषणाला जुमानत नसेल तर विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन जनजागृती केली जाणार आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा करू नये, असे सांगण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The property tax aggravation will be severe