बलात्काराच्या घटनेचा तेली समाजाकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 23:06 IST2018-02-26T23:06:51+5:302018-02-26T23:06:51+5:30
धुळे जिल्ह्यातील दोंडाई येथील पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी चंद्रपूर येथील तैलीक युवा, महिला एल्गार संघटना व तेली समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून करण्यात आली आहे.

बलात्काराच्या घटनेचा तेली समाजाकडून निषेध
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : धुळे जिल्ह्यातील दोंडाई येथील पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी चंद्रपूर येथील तैलीक युवा, महिला एल्गार संघटना व तेली समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
दोंडाई येथील तेली समाजाच्या बालिकेवर अत्याचार करण्यात आला. मात्र ही घटना दाबण्यासाठी संबंधीत ज्ञानोपासक शिक्षण संस्था मंडळ संचालित नूतन माध्यमिक विद्यालयाकडून व राजकारण्यांकडून दबाव टाकला जात आहे. पीडित बालिकेच्या आई-वडिलाला धमकाविणे सुरू आहे. त्यामुळे संस्था चालकांची चौकशी करुन बालिकेवर अत्याचार करणाºया व त्याला पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. बालिकेच्या कुटुंबावर दबाव टाकला जात असल्याने त्यांच्याशी सतत भ्रमणधवनीद्वारे संपर्क केला जात आहे. त्यामुळे कुटुंबाला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र रघाताटे, सचिव शैलेश जुमडे, नगरसेविका छब्बू वैरागडे, प्रदीप इटनकर, शितल इटनकर, अमर हजारे, उज्वला येरणे, माया खनके, चेतना येरणे, प्रितम लोणकर, रवी लोणकर, मीनाक्षी गुजरकर, प्रवीण चवरे आदी उपस्थित होते.