ग्रामगीता जीवन विकास परीक्षेंतर्गत कार्यक्रम
By Admin | Updated: August 10, 2014 22:55 IST2014-08-10T22:55:51+5:302014-08-10T22:55:51+5:30
अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम, मोझरीद्वारा संचालित ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभागाच्या वतीने चंद्रपूर जिल्हा ग्रामगीता जीवन विकास परीक्षा कार्यकर्ता मेळावा

ग्रामगीता जीवन विकास परीक्षेंतर्गत कार्यक्रम
वरोरा : अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम, मोझरीद्वारा संचालित ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभागाच्या वतीने चंद्रपूर जिल्हा ग्रामगीता जीवन विकास परीक्षा कार्यकर्ता मेळावा आणि प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम मोठे विठ्ठल मंदिर वरोरा येथे पार पडला.
सन २०१३-१४ मध्ये झालेल्या ग्रामगीता जीवन विकास परीक्षेच्या प्रत्येक गटातून प्रथम व द्वितीय क्रमांकाचे प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह, ग्रामगीता, प्रमाणपत्र आणि ध्यान तथा सामुदायीक प्रार्थनेचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ज्या विद्यालयांनी या परीक्षेत जास्तीत जास्त आणि सर्व गटातून विद्यार्थ्यांना परीक्षेत बसण्यास प्रोत्साहित केले. अशा सर्व केंद्राधिकारी, मुख्याध्यापकांना पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष रुपराव वाघ, उद्घाटक हभप प्रकाशमहाराज वाघ, गुलाबराव खवसे, दामोधर पाटील, लक्ष्मणराव गमे, बंडोपंत बोढेकर, महादेवराव मेटकर, प्रकाश महाकाळकर, विठ्ठल डाखरे उपस्थित होते.
लक्ष्मणराव गमे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून ग्रामगीता जीवन विकास परीक्षेचा दृष्टीकोन, बंडोपंत बोढेकर यांनी ग्रामगीता जीवन विकास परीक्षेची गरज आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या साहित्याची आजच्या युगात असलेली आवश्यकता, दामोधर पाटील यांनी शहिद क्रांतीज्योत यात्रा याबाबत मार्गदर्शन केले. मेटकर यांनी प्रचारकांना प्रचारकार्याविषयी तर गुलाबराव खवसे यांनी ग्रामगीता जीवन विकास परीक्षेची सविस्तर माहिती दिली.
प्रा. रुपलाल कावळे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. प्रा. अशोकराव चरडे यांनी आभार प्रदर्शन केले.
याप्रसंगी विविध शाळेतील परीक्षा प्रमुख मुख्याध्यापक, पे्रमलाल पारधी, उद्धव साबळे आणि असंख्य श्रीगुरुदेव उपासक आणि उपासिका उपस्थित होत्या. (तालुका प्रतिनिधी)