रुग्णवाहिका नसल्याने आरोग्य सेवेत अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:22 IST2021-06-04T04:22:19+5:302021-06-04T04:22:19+5:30
सावली तालुक्यातील अंतरगांव आरोग्य वर्धिनी केंद्राअंतर्गत येणारी बहुतांश गावे वनव्याप्त असून नेहमीच वन्यजीव व मानवी संघर्ष घडतो. ...

रुग्णवाहिका नसल्याने आरोग्य सेवेत अडचणी
सावली तालुक्यातील अंतरगांव आरोग्य वर्धिनी केंद्राअंतर्गत येणारी बहुतांश गावे वनव्याप्त असून नेहमीच वन्यजीव व मानवी संघर्ष घडतो. त्यामुळे जंगली श्वापदांच्या भीतीने अनेक रुग्णांना शासकीय आरोग्य संदर्भ सेवेला मुकावे लागते. परिणामी खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो. परिसरातील अनेक गावांतील वनक्षेत्रात वन्यजीवांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांना प्राथमिक उपचाराअंती गडचिरोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यासाठी न्यावे लागते. या आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेली रुग्णवाहिका ही भर रस्त्यात नेहमी बिघडत असते. अशावेळी रुग्णाला तातडीने उपचारासाठी नेण्याची पंचाईत होत असते. नाईलाजाने जखमींच्या नातेवाईकांना पर्यायी खासगी वाहन भाड्याने घेऊन जखमीस पुढील प्रवास करावा लागला.
===Photopath===
030621\img-20210531-wa0009.jpg
===Caption===
आजारी असलेली रुग्णवाहिका